Safe Sweets : दिवाळी फराळ खा पण ब्लड शुगर सांभाळा! पाहा मधुमेहींसाठी कोणती मिठाई सुरक्षित..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Diwali sweets and blood sugar : दिवाळीच्या काळात मिठाई खाण्याचा मोह टाळणे कठीण असते, खासकरून मधुमेह असलेल्या लोकांसाठी. पण काही मिठाई अशा आहेत, ज्या रक्तातील साखर अचानक आणि वेगाने वाढवतात. तर, काही मिठाई प्रमाणात खाल्ल्यास सुरक्षित मानल्या जातात. मधुमेह असलेल्या लोकांसाठी दिवाळीच्या फराळात कोणत्या मिठाई सुरक्षित आहेत आणि कोणत्या टाळायला हव्यात, याबद्दल माहिती खालीलप्रमाणे आहे.
ब्लड शुगर वेगाने वाढवणाऱ्या मिठाई : ब्लड शुगरची पातळी वेगाने वाढवणाऱ्या मिठाईंमध्ये जिलेबी, ईमरती, सोनपापडी यांसह आणखी पदार्थांचा समावेश होतो.
advertisement
जलेबी, इमरती यांचा उच्च ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 75 असतो. तर सोनपापडी ही मिठाई खूप मऊ आणि खुसखुशीत असल्याने तोंडात लगेच विरघळते आणि रक्तातील साखर वेगाने वाढवते.
advertisement
चमचम, रसगुल्ला आणि गुलाबजामून या मिठाईंमध्ये साखरेचा पाक भरलेला असतो, ज्यामुळे शुगर लेव्हल अचानक वाढते. त्यामुळे या सर्व मिठाया जपूनच खाव्या.
advertisement
प्रमाणात खाऊ शकता या मिठाई : रव्याचे लाडू, चुरमा लाडू, नारळाची बर्फी किंवा लाडू आणि म्हैसूर पाक या मिठाई तुम्ही मध्यम प्रमाणात खाऊ शकता, कारण त्या साखरेचे शोषण थोडे हळू करतात.
advertisement
या मिठाईंमध्ये तुपाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे साखरेचे शोषण मंद होते. मात्र या मिठाईंमध्ये तूप जास्त असल्याने वजन नियंत्रित ठेवणाऱ्या लोकांसाठी त्या जास्त आरोग्यदायी नसतात.
advertisement
मधुमेहींसाठी सर्वात या आहेत सुरक्षित मिठाई : उत्सव काळात मिठाईचा आनंद घ्यायचा असेल तर अंजीर रोल, काजू कतली, बदाम कतली आणि पिस्ता रोल या तीन-चार मिठाई सुरक्षित क्षेत्रात येतात. तुम्ही त्यांचे काही तुकडे खाऊ शकता.
advertisement
तज्ज्ञांच्या मते, या मिठाई सुरक्षित आहेत, कारण या मिठाईंचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 40 असतो. तसेच यात असलेले नट्स आणि फायबर शुगर लेव्हलला वेगाने वाढण्यापासून रोखतात.
advertisement
मिठाई खाताना डॉक्टर एक महत्त्वाची टीप देतात. गोड खाण्यापूर्वी आणि नंतर काहीतरी खारट पदार्थ नक्की खा. यामुळे तोंडातून मिठाईचा गोडवा संपेल आणि तुम्हाला जास्त गोड खाण्याची इच्छा होणार नाही. अन्यथा जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यास ब्लड शुगर वाढू शकते.
advertisement