काऊंटडाऊन सुरू! ८४ वर्षानंतर येणार नवपंचम शक्तिशाली राजयोग, दिवाळीपासून या राशींकडे येणार अफाट पैसा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे मानवाच्या जीवनात शुभ-अशुभ परिणाम घडतात. काही विशिष्ट ग्रहांच्या संयोगामुळे शुभ योग निर्माण होतात, ज्यामुळे धन, यश आणि प्रतिष्ठा वाढते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे मानवाच्या जीवनात शुभ-अशुभ परिणाम घडतात. काही विशिष्ट ग्रहांच्या संयोगामुळे शुभ योग निर्माण होतात, ज्यामुळे धन, यश आणि प्रतिष्ठा वाढते. या वर्षी दिवाळीच्या काळात असा एक महत्त्वाचा योग म्हणजेच नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. हा योग अत्यंत शुभ मानला जातो आणि काही राशींना अपार यश, संपत्ती आणि सन्मान प्राप्त करून देतो.
advertisement
नवपंचम राजयोग म्हणजे काय? १४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७:३४ वाजता शुक्र आणि अरुण ग्रह १२० अंशांवर एकमेकांपासून स्थित होतील, ज्यामुळे हा राजयोग निर्माण होईल. या वेळी अरुण ग्रह वृषभ राशीत आणि शुक्र कन्या राशीत विराजमान असतील. शुक्र हा सौंदर्य, संपत्ती आणि ऐश्वर्याचा ग्रह तर अरुण हा नवकल्पनांचा ग्रह आहे. या दोघांचा त्रिकोण योग काही राशींना प्रगती, सर्जनशीलता आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करेल.
advertisement
कुंभ राशी - या राजयोगामुळे कुंभ राशीच्या लोकांचे भाग्य उजळू शकते. शुक्र तुमच्या राशीतून आठव्या घरात गोचर करणार आहे, जो तुमच्या भाग्य आणि सुखस्थानाचा स्वामी आहे. त्यामुळे तुम्हाला अचानक लाभ होऊ शकतो. परदेश प्रवास किंवा नवी नोकरीची संधी मिळू शकते.व्यावसायिक जीवनात स्थैर्य येईल आणि दीर्घकाळ अडकलेले प्रकल्प पूर्ण होतील. वाहन,घर किंवा मालमत्ता खरेदीची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. हा काळ करिअर आणि वैयक्तिक जीवन दोन्ही क्षेत्रात प्रगतीचा ठरेल.
advertisement
मिथुन राशी - मिथुन राशीच्या लोकांसाठी हा योग अत्यंत शुभ ठरेल. शुक्र तुमच्या राशीतून चौथ्या भावात गोचर करीत असल्याने कौटुंबिक आनंद, स्थावर मालमत्ता आणि सुखसोयींचा लाभ मिळेल. घरगुती वाद मिटून नात्यांमध्ये सौहार्द निर्माण होईल. नवीन घर,वाहन किंवा जमीन खरेदीची शक्यता आहे. नोकरीत कार्यप्रगती आणि पदोन्नती मिळू शकते. वरिष्ठांचा आदर आणि समाजात प्रतिष्ठा वाढेल. हा काळ आर्थिक दृष्ट्या समृद्धी देणारा असेल. विवाह आणि प्रेमसंबंधांसाठीही अनुकूल वातावरण निर्माण होईल.
advertisement
सिंह राशी - सिंह राशीसाठी नवपंचम राजयोग हा आर्थिक वाढीचा आणि कीर्तीचा काळ घेऊन येतो. हा योग तुमच्या धनभाव आणि वाणीस्थानी होणार असल्याने अचानक धनलाभ आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसाय आणि गुंतवणुकीत नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन करिअर संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे पदोन्नती होऊ शकते. संवादकौशल्य आणि प्रभावी वाणीमुळे तुम्ही इतरांवर छाप पाडाल. अडकलेले व्यवहार मार्गी लागतील आणि कुटुंबात आनंद वाढेल.