Success Story : शिक्षणात नाही लागले मन, तरुणाने सुरू केलं मटण भाकरी सेंटर, महिन्याला 4 लाखाची उलाढाल

Last Updated:

स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा या तरुणाच्या अंगी असल्याने आज हा तरुण त्याचा व्यवसाय सांभाळत असतो.

+
News18

News18

नाशिक: शिक्षणात काही मन लागत नाही, याकरता आपण स्वतःचाच व्यवसाय करू या विचाराने नाशिकमधील ऋषिकेश बोधक या 18 वर्षाच्या तरुणाने स्वतःचे मटण भाकरी सेंटर उभारले असून, दर महिन्याला 3 ते 4 लाखाची उलाढाल सुद्धा हा तरुण उद्योजक करत आहे. जे वय फिरण्या - बागडण्याचे आहे, त्या वयातच स्वतःचे काहीतरी अस्तित्व निर्माण करण्याची इच्छा या तरुणाच्या अंगी असल्याने आज हा तरुण त्याचा व्यवसाय सांभाळत असतो.
घराची परिस्थिती हलाखीची असल्याने ऋषिकेश हा त्याच्या वडिलांसोबत इतरांच्या हॉटेलमध्ये कामाला जात असे. परंतु काही काळानंतर ऋषिकेश याच्या वडिलांनी स्वतःच्या हिमतीवर छोटे नाश्ता सेंटर सुरू केले. त्यानंतर ऋषिकेश हा त्यांच्या दुकानाला सांभाळू लागला. शिक्षणात काही गोडी नसल्याने आपण आपलाच व्यवसाय वाढवू या विचाराने दिवस-रात्र हा तरुण काम करत असे.
advertisement
हा तरुण 18 वर्षाचा असून आज नाशिकमध्ये आई-वडिलांच्या साथीमुळे आणि स्वतःच्या जिद्दीमुळे तब्बल स्वतःचे 4 दुकान सांभाळत असतो. एक वेळ इतरांच्या हाताखाली काम करणारा ऋषिकेश महिन्याला 3 ते 4 लाख रुपयांची उलाढाल सुद्धा करत असतो. तर इतकेच नाही, आज हा तरुण इतर 10 लोकांचे देखील घर चालवायला मदत करत असतो.
advertisement
कोरोनाकाळात हॉटेल बंद करण्याची वेळ असली असताना देखील हार न मानता आई-वडिलांसोबत जिद्दीने लढत आलेल्या या तरुणाचे आज स्वप्न देखील पूर्ण होताना दिसत आहे. ज्या वयात तरुण मुले मौजमजा करतात, फिरतात, हिंडतात, त्या वयात हा तरुण स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्याच्या मागे लागला असून, हा तरुण या तरुण पिढीसमोर एक आदर्श सुद्धा निर्माण करत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : शिक्षणात नाही लागले मन, तरुणाने सुरू केलं मटण भाकरी सेंटर, महिन्याला 4 लाखाची उलाढाल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement