बेड ठरला मृत्यूचा सापळा, झोपेत कूस बदलली अन् धडधाकट पोलिसाचा करुण अंत, सोलापुरातील घटना!

Last Updated:

Solapur News: सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. इथं रात्री बेडवर झोपलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला आहे.

News18
News18
प्रीतम पंडित, प्रतिनिधी सोलापूर: सोलापूर शहरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मन हेलावणारी घटना समोर आली आहे. इथं रात्री बेडवर झोपलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा करुण अंत झाला आहे. ते रात्री आपल्या घरातील बेडवर झोपले होते. पण त्यांचा हा बेड त्यांच्यासाठी मृत्यूचा सापळा ठरला आहे. पहाटे बेडवरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे.
संभाजी शिवाजी दोलतोडे असं मृत पावलेल्या पोलिसाचं नाव आहे. ते सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत होते. सोमवारी पहाटे बेडवरून पडून त्यांचा मृत्यू झाला आहे. बेडवरून पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मयत दोलतोडे हे सोलापूर शहरातील वाहतूक शाखेत कार्यरत होते.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसर, शिवाजी दोलतोडे हे रविवारी रात्री आपल्या घरी बेडवर झोपले होते. पहाटे गाढ झोपेत कूस बदलण्याचा प्रयत्न करत असताना ते बेडवरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच यानंतर त्यांना उलटी देखील झाल्याची माहिती आहे. ही घटना घडताच दोलतोडे यांच्या पत्नीने त्यांना तातडीने सोलापुरातील खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
advertisement
संभाजी दोलतोडे हे मूळचे माढा तालुक्यातील उपळाई खुर्द गावचे रहिवासी होते. ते सोलापूरात आपल्या कुटुंबासह राहत होते. तसेच ते गोळा फेक आणि थाळी फेक या खेळात अग्रेसर होते. अशा धडधाकट पोलिसाचा बेडवरून पडून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. संभाजी दोलतोडे यांना पत्नी, एक दीड वर्षाची मुलगी आणि सहा वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बेड ठरला मृत्यूचा सापळा, झोपेत कूस बदलली अन् धडधाकट पोलिसाचा करुण अंत, सोलापुरातील घटना!
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement