'6 वर्षांची झाली तरी लेक मराठीत नीट बोलेना', जन्मदात्या आईने मुलीला संपवलं, नवी मुंबईतील घटना

Last Updated:

२३ डिसेंबरच्या रात्री या आईने मुलगी संपविण्याचा कट रचला. त्या दिवशी आजी नातीला भेटण्यासाठी भेटवस्तू घेऊन घरी आली होती; मात्र...

News18
News18
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई : नवी मुंबईतून आई आणि लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. ६ वर्षांच्या चिमुरडी बोलताना अडखळते म्हणून एका आईने आपल्या पोटच्या गोळ्याचा खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी ३० वर्षीय आईला कळंबोली पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील  ळंबोलीतील सेक्टर १ मधील गुरूसंकल्प सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे.  या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी संबंधित ३० वर्षीय महिलेला अटक केली आहे.  गुरूसंकल्प सोसायटीत आयटी अभियंता असलेला पती आणि आरोपी बीएस्सीपर्यंत शिक्षण घेतलेली पत्नी वास्तव्यास होती.
advertisement
6 वर्षांची झाली तरी बोलता येईना
२०१७ मध्ये विवाह झाल्यानंतर २०१९ साली त्यांना कन्यारत्न झालं. मात्र, मुलगी ६ वर्षांची झाली तरी तिला बोलण्यास अडचण येत होती.  मुलीला लहानपणापासून बोलण्यात अडथळा येत होता. ती मराठीऐवजी हिंदी भाषेत अधिक बोलत असल्यानं आई सतत नाराज होती. “मुलगी नको, ती व्यवस्थित बोलत नाही,” असं ती अनेकदा पतीकडे सांगत होती, असं तपासात निष्पन्न झालं आहे. पतीने तिला समज देण्याचा प्रयत्न केला होता.
advertisement
हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा बनाव
अखेर २३ डिसेंबरच्या रात्री या आईने मुलगी संपविण्याचा कट रचला. त्या दिवशी आजी नातीला भेटण्यासाठी भेटवस्तू घेऊन घरी आली होती; मात्र तिची आणि बालिकेची भेट होऊ शकली नाही. काही वेळाने पती घरी परतल्यानंतर मुलगी झोपेतून उठत नसल्याचं लक्षात येताच सर्वांनी तातडीनं रुग्णालयात धाव घेतली. तिथं सुरुवातीला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा बनाव करण्यात आला.
advertisement
गुदमरून मुलीचा मृत्यू
मात्र, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते यांना मृत्यू संशयास्पद वाटल्यानं त्यांनी शवविच्छेदनाची विशेष विनंती केली. प्राथमिक अहवालात श्वसनमार्ग अडथळ्याचे संकेत मिळताच आई-वडिलांची कसून चौकशी करण्यात आली. सुमारे सहा तासांच्या चौकशीनंतर अखेर आईनेच मुलीचा गुदमरून खून केल्याची कबुली दिली. या निर्दयी कृत्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिलेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. तसंच, या महिलेवर मनोविकार तज्ज्ञांकडे उपचार सुरू असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
'6 वर्षांची झाली तरी लेक मराठीत नीट बोलेना', जन्मदात्या आईने मुलीला संपवलं, नवी मुंबईतील घटना
Next Article
advertisement
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement