RSS शिबिरात लैंगिक अत्याचार, छळाचा आरोप, 26 वर्षीय इंजिनिअरने उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Shrikant Bhosale
- Reported by:प्रशांत लीला रामदास
Last Updated:
RSS : आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण दिले आहे.
तिरुवनंतपूरम: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असणाऱ्या एका 26 वर्षीय तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित टोकाचे पाऊल उचलण्याचे कारण दिले आहे. संघाच्या शिबिरात लैंगिक छळ होत असल्याचे आपण हे नैराश्येतून पाऊल उचलत असल्याचे त्याने म्हटले. या घटनेने केरळमध्ये खळबळ उडाली आहे.
advertisement
केरळमधील कोट्टायम येथील 26 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर आनंदू आजी याने आत्महत्या केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आनंदूचा मृतदेह 9 ऑक्टोबर रोजी तिरुवनंतपुरममधील थंपनूर येथील एका लॉजमध्ये आढळला. मृत्यूपूर्वी त्याने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) सदस्यांकडून झालेल्या लैंगिक आणि शारीरिक शोषणाबद्दल धक्कादायक खुलासा केला होता.
advertisement
आत्महत्येपूर्वीच्या पोस्टमध्ये काय म्हटले?
आनंदूने टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, त्याचे वडील बालपणीच संघाच्या शाखेत घेऊन गेले होते. त्यानंतर त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका एन.एम. नावाच्या संघाच्या स्वयंसेवकाकडून लैंगिक छळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर संघाच्या काही शिबिरांमध्येही त्याच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे त्याने म्हटले.
advertisement
आनंदू याने म्हटले की, मी टोकाचं पाऊल हे कोणत्याही प्रेमसंबंधामुळे नाही तर बालपणी झालेल्या अत्याचारांमुळे, मानसिक आघातांमुळे उचलत आहे. काही वर्षांपूर्वी त्याला ऑब्सेसिव्ह-कंपल्सिव्ह डिसऑर्डर (OCD) असल्याचे निदान झाले होते. या आजाराचे मूळ आरएसएसमधील अत्याचारात असल्याचा त्याचा दावा होता. आरएसएससारखा द्वेषपूर्ण संघ या देशात दुसरा नाही. आरएसएस सदस्यांशी मैत्री करू नका, जरी ते तुमचे वडील, भाऊ किंवा मुलगा असले तरी त्यांच्यापासून दूर राहा असे त्याने आपल्या शेवटच्या पोस्टमध्ये म्हटले. आनंदूने संघामध्ये होणाऱ्या अत्याचारांबद्दल समाजाने डोळेझाक केल्याची खंतही व्यक्त केली.
advertisement
पालकांना भावनिक सल्ला
आनंदूने आपल्या पत्रात पालकांना भावनिक आवाहन करत लिहिले, “आपल्या मुलांशी वेळ घालवा, त्यांच्याशी जवळीक निर्माण करा. बालपणीचा त्रास आयुष्यभर त्रास देतो. कोणत्याही मुलाला माझ्यासारखं आयुष्य जगावं लागू नये.”
advertisement
पोलिसांकडून गुन्हा दाखल...
या घटनेनंतर काँग्रेस पक्षाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाने म्हटले आहे की, आरएसएसवर गंभीर आरोप झाले असून, दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी. दरम्यान, पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत आनंदूने आयुष्यातील या प्रसंगाबद्दल कुणालाही काही सांगितले नव्हते, असे समोर आले आहे. कुटुंबीयांनाही अत्याचारांची कल्पना नव्हती, मात्र काही महिन्यांपासून तो मानसिक आरोग्याच्या समस्यांनी त्रस्त असल्याचे नातेवाईकांनी सांगितले.
advertisement
Location :
Kerala
First Published :
October 13, 2025 1:18 PM IST
मराठी बातम्या/क्राइम/
RSS शिबिरात लैंगिक अत्याचार, छळाचा आरोप, 26 वर्षीय इंजिनिअरने उचललं टोकाचं पाऊल