advertisement

Gold News: इस्रायल-इराण युद्धात चीननं डाव साधला, सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ!

Last Updated:

Gold News: इस्रायल-अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारल्यानंतर जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. आखातात युद्ध पेटल्याने गॅस, इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे.दुसरीकडे चीनने आपला डाव खेळला आहे.

Gold News: इस्रायल-इराण युद्धात चीनचा मोठा डाव, सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ!
Gold News: इस्रायल-इराण युद्धात चीनचा मोठा डाव, सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ!
Gold News: इस्रायल-अमेरिकेने इराण विरोधात युद्ध पुकारल्यानंतर जागतिक पातळीवर मोठ्या घडामोडी घडत आहेत. आखातात युद्ध पेटल्याने गॅस, इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळे युद्ध लवकर संपुष्टात यावं अशी इच्छा जगभरातून व्यक्त होत आहे. एका बाजूला युद्धाची रणधुमाळी सुरू असताना दुसरीकडे चीनने आपला डाव खेळला आहे. चीनने खेळलेल्या डावामुळे जागतिक बाजारात चिंता व्यक्त केली जात आहे.
जागतिक अर्थव्यवस्थेत स्वतःचे वर्चस्व टिकवण्यासाठी चीनने आपली 'सुवर्ण' मोहीम अधिक तीव्र केली आहे. चीनची मध्यवर्ती बँक 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने (PBOC) फेब्रुवारी महिन्यातही सोन्याची खरेदी सुरूच ठेवली असून, ही खरेदी आता सलग १६ व्या महिन्याच्या विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. शनिवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, चीनच्या सोन्याच्या साठ्यात फेब्रुवारीमध्ये ३०,००० ट्रॉय औंसची भर पडली असून, एकूण साठा ७४.२२ दशलक्ष फाइन ट्रॉय औंसवर पोहोचला आहे. चीन एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याचा साठा हा अमेरिकेच्या डॉलरच्या वर्चस्वाला धक्का देण्यासाठी करत आहे का, असा सवाल उपस्थित आहे.
advertisement

युद्धजन्य परिस्थितीमुळे किमतीत भडका

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावाचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर झाला आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सुरक्षित मालमत्ता म्हणून सोन्याकडे पाहण्याचा ओघ वाढला आहे. यामुळे सोन्याच्या किमतीने प्रति औंस ५,००० डॉलर्सचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. जरी गेल्या काही दिवसांत किमतीत किंचित घट झाली असली, तरी जागतिक अस्थिरतेमुळे सोने पुन्हा एकदा तेजीत आले आहे.
advertisement

जागतिक बँकांची संमिश्र भूमिका

'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'च्या (WGC) अहवालानुसार, वर्षाच्या सुरुवातीला काही मध्यवर्ती बँकांची खरेदी मंदावली आहे. जानेवारीत केवळ ५ टन निव्वळ खरेदी झाली, जी १२ महिन्यांच्या सरासरी २७ टनांपेक्षा खूपच कमी आहे. विश्लेषक मारिसा सलीम यांच्या मते, किमतीतील अस्थिरता आणि सुट्टीच्या हंगामामुळे हा तात्पुरता खंड असू शकतो. मात्र, २०२६ आणि त्यानंतरही सोन्याचा संचय सुरू राहण्याची शक्यता आहे.
advertisement

रशिया आणि व्हेनेझुएलाची सोने विक्री

एकीकडे चीन सोने साठवत असताना, दुसरीकडे रशिया आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांनी आपल्याकडील सोन्याची विक्री केली आहे. विशेष म्हणजे, पोलंडने आपल्या संरक्षण खर्चासाठी निधी उभारण्याकरिता सोन्याचा साठा विकण्याचा प्रस्ताव मांडला आहे. तरीही जागतिक स्तरावर सोन्याची एकूण खरेदी ही विक्रीपेक्षा अधिक असल्याचे दिसून येत आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold News: इस्रायल-इराण युद्धात चीननं डाव साधला, सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ!
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement