advertisement

IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाने 22 मिनिटात विषय संपवला! पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाच्या पोरींचा 10 विकेट्सने पराभव

Last Updated:

Australia Women vs India Women : ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 125 रन्सची मोठी लीड घेतली. बॉलिंगमध्ये चमक दाखवणाऱ्या अ‍ॅनाबेल सदरलँडने बॅटिंगमध्येही कमाल करत 129 रन्सची शतकी खेळी केली.

Australia Women beat India Women by 10 wickets
Australia Women beat India Women by 10 wickets
India women vs Australia women : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय महिला क्रिकेट टीमला एकमेव डे-नाईट कसोटी मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. पर्थच्या वाका (WACA) मैदानावर खेळल्या गेलेल्या या मॅचमध्ये यजमान ऑस्ट्रेलियाने भारताचा 10 विकेट्सनी धुव्वा उडवला. एलीसा हीलीच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन टीमने केवळ 3 दिवसांच्या आत ही मॅच जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या पराभवामुळे भारतीय टीमच्या फलंदाजीतील उणिवा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या आहेत.

पहिल्या इनिंगमध्ये 198 रन्सवर ऑल आऊट

या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. भारतीय महिला टीम पहिल्या इनिंगमध्ये 62.4 ओव्हर्समध्ये अवघ्या 198 रन्सवर ऑल आऊट झाली. भारताकडून जेमिमा रोड्रिग्सने सर्वाधिक 52 रन्स केले, मात्र इतर कोणत्याही बॅटरला खेळपट्टीवर तग धरता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅनाबेल सदरलँडने 4 विकेट्स घेत भारतीय बॅटिंग लाईनअपचे कंबरडे मोडले.
advertisement

पहिल्या इनिंगमध्ये 323 रन्सचा डोंगर

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 323 रन्सचा डोंगर उभा केला आणि 125 रन्सची मोठी लीड घेतली. बॉलिंगमध्ये चमक दाखवणाऱ्या अ‍ॅनाबेल सदरलँडने बॅटिंगमध्येही कमाल करत 129 रन्सची शतकी खेळी केली. तिला एलीसा पॅरीने 76 रन्सची साथ दिली. भारताकडून सायली सातघरेने 4 विकेट्स घेतल्या, तर क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
advertisement

भारतीय टीम पुन्हा एकदा अपयशी  

दरम्यान, 125 रन्सच्या पिछाडीसह दुसऱ्या इनिंगमध्ये मैदानात उतरलेली भारतीय टीम पुन्हा एकदा अपयशी ठरली. संपूर्ण टीम केवळ 149 रन्सवर गारद झाली, ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 25 रन्सचे छोटे टार्गेट मिळाले. हे टार्गेट ऑस्ट्रेलियाने 4.3 ओव्हर्समध्ये एकही विकेट न गमावता सहज पूर्ण केले. भारतीय टीमची दुसरी इनिंग पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्याने ही मॅच तिसऱ्या दिवशीच संपली.
advertisement

विजयाची शिल्पकार अ‍ॅनाबेल सदरलँड

दरम्यान, या विजयाची खरी शिल्पकार अ‍ॅनाबेल सदरलँड ठरली. तिने संपूर्ण मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या आणि 129 रन्सची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली. तिच्या या ऑलराऊंडर कामगिरीमुळे तिला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आलं.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND W vs AUS W : ऑस्ट्रेलियाने 22 मिनिटात विषय संपवला! पिंक बॉल टेस्टमध्ये टीम इंडियाच्या पोरींचा 10 विकेट्सने पराभव
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement