Eye Colours : डोळ्यांचा बदलतोय रंग, आरोग्यवर होऊ शकतो गंभीर परिणाम; वेळेपूर्वीच ओळखा 'या' वार्निंग्स

Last Updated:
तुमच्या डोळ्यांचा रंग आणि त्या रंगात होणारे बदल अनेकदा तुमच्या शरीरातील लपलेल्या समस्यांचे संकेत देतात. वैद्यकीय संशोधनानुसार, डोळ्यांमधील आयरीस मध्ये असलेल्या मेलेनिनच्या प्रमाणावर तुमच्या आरोग्याचे काही धोके अवलंबून असतात.
1/7
तुमच्या डोळ्यांचा रंग आणि त्या रंगात होणारे बदल अनेकदा तुमच्या शरीरातील लपलेल्या समस्यांचे संकेत देतात. वैद्यकीय संशोधनानुसार, डोळ्यांमधील आयरीस मध्ये असलेल्या मेलेनिनच्या प्रमाणावर तुमच्या आरोग्याचे काही धोके अवलंबून असतात. त्यामुळे, डोळ्यांच्या रंगाकडे लक्ष दिल्यास वेळेत मोठे आजार ओळखणे शक्य होते.

advertisement
2/7
हलक्या रंगाचे डोळे आणि त्वचेचा कर्करोग: ज्या लोकांचे डोळे निळे, हिरवे किंवा राखाडी असतात, त्यांच्या आयरीसमध्ये मेलेनिनचे प्रमाण कमी असते. मेलेनिन कमी असल्याने त्यांना डोळ्यांचा आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका थोडा जास्त असतो. त्यांनी सूर्याच्या प्रखर किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणे आवश्यक आहे.

3/7
गडद रंगाचे डोळे आणि मोतीबिंदू: गडद रंगाच्या डोळ्यांमध्ये मेलेनिन जास्त असते. काही अभ्यासांनुसार, जास्त मेलेनिनमुळे गडद डोळ्यांच्या लोकांना मोतीबिंदू होण्याची शक्यता जास्त असू शकते. त्यामुळे त्यांनी नियमित डोळ्यांची तपासणी करावी.

4/7
डोळ्याभोवती पिवळे वलय: काहीवेळा बुबुळाच्या भोवती पांढऱ्या-करड्या किंवा पिवळ्या रंगाचे वलय तयार होते, ज्याला 'आर्कस सेनिलिस' म्हणतात. हे उच्च कोलेस्टेरॉल आणि हृदयरोग वाढल्याचे लक्षण असू शकते.

5/7
डोळ्यांचा रंग अचानक बदलणे: जर तुमच्या डोळ्यांचा रंग अचानक किंवा वेगाने बदलत असेल, तर ते युव्हेटिस, विशिष्ट औषधे किंवा डोळ्यांना झालेल्या दुखापतीमुळे असू शकते. अशावेळी त्वरित डॉक्टरांना भेटावे.

6/7
डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा होणे: डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा दिसणे हे कावीळचे स्पष्ट लक्षण आहे. कावीळ यकृताच्या बिघडलेल्या कार्यामुळे होते, जेव्हा बिलीरुबिन शरीरात जमा होते.

7/7
गडद डोळे आणि अल्कोहोल संवेदनशीलता: काही संशोधनानुसार, गडद रंगाचे डोळे असलेल्या व्यक्तींना अल्कोहोलची संवेदनशीलता अधिक असू शकते. तर हलक्या रंगाचे डोळे असलेल्या लोकांना प्रकाशाची संवेदनशीलता जास्त असते. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement