IND vs WI : 'तुम्हाला माहितीये आऊट आहे...', DRS ड्रामानंतर जसप्रीत बुमराहचा सनसनाटी आरोप, स्टंप माईकमधून सगळं ऐकायला आलं!

Last Updated:

Jasprit Bumrah On LBW Umpires Decision : टीव्ही रिप्लेमध्ये बॉल लेग स्टम्पच्या अगदी जवळून जात असल्याचे दिसले आणि नियमानुसार थर्ड अम्पायरने 'अम्पायर्स कॉल'च्या आधारावर कॅम्पबेलला नॉट आऊट ठेवले.

Jasprit Bumrah On LBW Umpires Decision
Jasprit Bumrah On LBW Umpires Decision
IND vs WI 2nd Test In Delhi : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीत सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट मॅचमध्ये वेस्ट इंडिजचा ओपनर जॉन कॅम्पबेलला तिसऱ्या दिवसाच्या खेळादरम्यान मिळालेल्या एलबीडब्ल्यू निर्णयामुळे मैदानात आणि बाहेरही वादंग निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या वेगवान बॉलर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) या निर्णयावर थेट स्टंप माईकवर प्रतिक्रिया दिली, जी आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एलबीडब्ल्यू अपीलवर थर्ड अम्पायरने कॅम्पबेलला नॉट आऊट दिल्यानंतर निराश झालेल्या बुमराहने मराठीत किंवा हिंदीत नसतानाही, आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली.

कॅम्पबेलला नॉट आऊट ठेवलं

मॅचच्या एका महत्त्वाच्या क्षणी बुमराहचा एक बॉल कॅम्पबेलच्या पॅडला लागला. मैदानावरील अम्पायरने नॉट आऊट दिल्यावर टीम इंडियाने रिव्ह्यू घेतला. टीव्ही रिप्लेमध्ये बॉल लेग स्टम्पच्या अगदी जवळून जात असल्याचे दिसले आणि नियमानुसार थर्ड अम्पायरने 'अम्पायर्स कॉल'च्या आधारावर कॅम्पबेलला नॉट आऊट ठेवले. याच निर्णयावर बुमराह निराश झाला. त्यावेळी तो स्टंप माईकमध्ये असा काही म्हटला की, सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.
advertisement

अम्पायर्स कॉलवर चर्चांना उधाण

"You Know It’s Out But Technology Can’t Prove It" (तुम्हाला माहीत आहे की तो आऊट आहे, पण टेक्नॉलॉजी ते सिद्ध करू शकत नाही). बुमराहच्या या वक्तव्याने क्रिकेट विश्वात पुन्हा एकदा डिसीजन रिव्ह्यू सिस्टम आणि अम्पायर्स कॉलवर चर्चांना उधाण आले आहे. बुमराहच्या वक्तव्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
advertisement

पाहा Video

वेस्ट इंडिज प्लेइंग इलेव्हन : जॉन कॅम्पबेल, टॅगेनारिन चंद्रपॉल, ॲलिक अथानाझे, शाई होप, रोस्टन चेस (कॅप्टन), टेविन इम्लाच (विकेटकीपर), जस्टिन ग्रीव्हस, जोमेल वॅरिकन, खारी पियरे, अँडरसन फिलिप आणि जेडेन सील्स.
advertisement
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुबमन गिल (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs WI : 'तुम्हाला माहितीये आऊट आहे...', DRS ड्रामानंतर जसप्रीत बुमराहचा सनसनाटी आरोप, स्टंप माईकमधून सगळं ऐकायला आलं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement