Shah Rukh Khan : असं पहिल्यांदाच घडलं! 'मन्नत'वर शुकशुकाट, फॅन्सला भेटायला शाहरुख स्वत:च रस्त्यावर आला,VIDEO
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Shah Rukh Khan Meet Fans : अभिनेता शाहरुख खानने अनेक वर्षात असं पहिल्यांदा केलंय. शाहरुख खान चाहत्यांना भेटण्यासाठी स्वत: रस्त्यावर आलाय. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी त्याचे लाखो चाहते मन्नतबाहेर गर्दी करतात. मुंबईतील वांद्रे येथे असलेला शाहरुखनचा बंगला मन्नतवर आजही चाहत्यांची गर्दी असते. पण काही महिन्यांआधी शाहरुख मन्नत बंगला सोडून दुसरीकडे शिफ्ट झाला. शाहरुख मन्नतच्या बाहेर येऊन त्याच्या गच्चीतून चाहत्यांना आपली झलक दाखवायचा. पण शाहरुखने मन्नत सोडल्यापासून मन्नतबाहेर शुकशुकाट पाहायला मिळतोय. असं असलं तरी चाहत्यांना भेटण्यासाठी शाहरुख स्वत: रस्त्यावर उतरला. शाहरुखने रस्त्यावर उतरून त्याच्या लाखो चाहत्यांची भेट घेतली. शाहरुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
शाहरुख खान आणि दिग्दर्शक करण जोहर यांनी एकत्र येत Filmfare Awards 2025 चा भव्य सोहळा साजरा केला. हा कार्यक्रम 11 ऑक्टोबर 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडला. शाहरुख खानच्या एन्ट्रीने या शोची शोभा आणखी वाढवली.
advertisement
चाहत्यांना भेटण्यासाठी रस्त्यावर उतरला शाहरुख
शाहरुख खानच्या कार्यक्रमातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शो संपल्यानंतर शाहरुख स्वत: कारमधून बाहेर आला आणि चाहत्यांना त्याची झलक दाखवली. व्हिडिओमध्ये शाहरुख चाहत्यांना हात दाखवता, त्यांना फ्लाइक किस करताना दिसतोय. शाहरुखची एक झलक पाहून त्याचे चाहते देखील भारावून गेले.
advertisement
चाहत्यांकडून कमेन्टचा पाऊस
सोशल मीडियावर चाहत्यांनी किंग खानचं कौतुक करत भरभरून कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका चाहत्याने लिहिलं, "हेच खरं स्टारडम आहे, देवाने त्याला खास बनवलंय." दुसऱ्याने म्हटलं, "तो अगदी बरोबर होता. त्याच्यानंतर कोणीही सुपरस्टार येणार नाही." आणखी एकाने लिहिलंय, "बॉलिवूडमध्ये आता फक्त एकच खरा स्टार आहे शाहरुख खान."
advertisement
advertisement
शाहरुख-काजोलचा रोमँटिक परफॉर्मन्स
या पुरस्कार सोहळ्यातील मुख्य आकर्षण ठरले शाहरुख खान आणि काजोल यांचा रोमँटिक परफॉर्मन्स. या आयकॉनिक जोडप्याने त्यांच्या सुपरहिट गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. आता चाहते टीव्हीवर हा संपूर्ण परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
किंगच्या शूटींगमध्ये शाहरुख बिझी
सध्या शाहरुख खान आपल्या आगामी 'किंग' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण, सुहाना खान, राणी मुखर्जी, अभिषेक बच्चन, अर्शद वारसी आणि अभय वर्मा असे अनेक कलाकार झळकणार आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा चित्रपट 2026 मध्ये रिलीज होणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 1:46 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Shah Rukh Khan : असं पहिल्यांदाच घडलं! 'मन्नत'वर शुकशुकाट, फॅन्सला भेटायला शाहरुख स्वत:च रस्त्यावर आला,VIDEO