Diwali Pahat: पुणेकरांची यंदाची दिवाळी पहाट खास होणार, दिग्गज कलाकारांसोबत या ठिकाणी होणार जंगी सेलिब्रेशन...
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
यावर्षी पुणेकरांसाठी पाच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये रसिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांचा अनुभव घेण्याची संधी विनामूल्य मिळणार आहे.
दिवाळी म्हटलं की... मंत्रमुग्ध करणारी दिवाळी पहाट आलीच यावर्षी पुणेकरांसाठी पाच ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या दिवाळी पहाट कार्यक्रमांमध्ये रसिकांना आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्गज कलाकारांचा अनुभव घेण्याची संधी विनामूल्य मिळणार आहे. यावर्षी दिवाळी पहाट कार्यक्रम कुठे कुठे आयोजित होणार आहेत, याविषयी अधिक माहिती घेऊ
advertisement
दिवाळीच्या आनंदात भर घालणारी संगीताची मेजवानी येत्या 18 ऑक्टोबरला पहाटे 5.30 वाजता श्रीमान महासाधू श्री मोरया गोसावी क्रीडासंकुल येथे रंगणार आहे. या दिवाळी पहाट कार्यक्रमात पद्मश्री सुरेश वाडकर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी रवींद्र यांचे सुमधुर सादरीकरण रसिकांसाठी खास आकर्षण ठरणार आहे.
advertisement
हडपसरवासीयांसाठी यंदाची दिवाळी पहाट खास ठरणार आहे. येत्या 19 ऑक्टोबरला पहाटे 5.30 वाजता विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम येथे संगीताची सुंदर मेजवानी रंगणार आहे. या कार्यक्रमात पं. रघुनंदन पणशीकर, विदुषी सावनी शेंडे, आर्या आंबेकर आणि रमाकांत गायकवाड यांचे सुमधुर सादरीकरण होणार आहे.
advertisement
बालेवाडीत होणारी यंदाची दिवाळी पहाट रसिकांसाठी खास ठरणार आहे. या कार्यक्रमात पद्मश्री शुभा मुद्गल, नीलाद्री कुमार आणि सत्यजित तळवलकर या दिग्गज कलावंतांचा मनमोहक कलाविष्कार अनुभवता येणार आहे.हा कार्यक्रम 20 ऑक्टोबर रोजी पहाटे 5:30 वाजता, सी. एम. इंटरनॅशनल स्कूल मैदान, एस. के. पी. कॅम्पस, बालेवाडी येथे आयोजित करण्यात आला आहे.
advertisement
21 ऑक्टोबर, पहाटे 5:30 वाजता, अण्णा भाऊ साठे सभागृह, पद्मावती, सातारा रोड येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी रसिकांना तीन दिग्गज कलाकारांचा कलाविष्कार अनुभवता येणार आहे. पं. शौनक अभिषेकी, विदुषी मंजूषा पाटील आणि पं. जयतीर्थ मेवुंडी यांचे सादरीकरण या दिवाळी पहाटेचे विशेष आकर्षण ठरणार आहे.
advertisement
तीन आघाडीचे कलाकार एकत्र येतात, तेव्हा रसिकांसाठी निर्माण होतो एक अस्मरणीय क्षण.22 ऑक्टोबर, पहाटे 5:30 वाजता, कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन्स मध्ये होणाऱ्या दिवाळी पहाटेत रसिकांना खास अनुभव मिळणार आहे. या कार्यक्रमात पद्मविभूषण पं. विश्व मोहन भट यांच्या मोहन वीणेचे स्वर, पद्मश्री विजय घाटे यांच्या तबल्याची झंकार आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक महेश काळे यांचे भावपूर्ण गायन ऐकायला मिळणार आहे.