'मी गुडघे टेकतो... पण तुला काम मिळालं का?'; सलमान खानने केला अभिनव कश्यपचा पर्दाफाश, सगळंच बाहेर काढलं
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Salman Khan-Abhinav Kashyap Controversy : 'बिग बॉस १९' च्या नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये सलमानने स्टँड-अप कॉमेडियन रवी गुप्ताशी बोलताना, अभिनव कश्यपने केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा थेट समाचार घेतला.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आणि 'दबंग' चित्रपटाचे माजी दिग्दर्शक अभिनव कश्यप यांच्यातील जुना वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 'बिग बॉस १९' च्या नुकत्याच झालेल्या 'वीकेंड का वार' एपिसोडमध्ये सलमानने स्टँड-अप कॉमेडियन रवी गुप्ताशी बोलताना, अभिनव कश्यपने केलेल्या एका वादग्रस्त विधानाचा थेट समाचार घेतला.
अभिनव कश्यपने काही दिवसांपूर्वी सलमान खानबद्दल बोलताना, 'एके दिवशी सलमानला गुडघे टेकावे लागतील,' असे म्हटले होते. यावर प्रत्युत्तर देताना सलमानने नेहमीप्रमाणे शांत पण धारदार टोला लगावला.
सलमान खानने खास शैलीत घेतला अभिनव कश्यपचा समाचार
सलमान म्हणाला, "आमचे एक दबंग मित्र आहेत. आता तर त्यांनी माझ्यासोबत आमिर आणि शाहरुखलाही यात खेचलं आहे. मला फक्त इतकंच विचारायचं आहे - काम मिळालं का रे भाऊ?" सलमानचा हा स्वर वरवर हलका असला तरी, त्याच्या या प्रश्नात अभिनवच्या सततच्या सार्वजनिक टीकांवर एक प्रकारचा उपरोध दडलेला होता.
advertisement
पुढे सलमानने नकारात्मकता करियरसाठी कशी हानिकारक ठरते, यावर भाष्य केले. तो म्हणाला, "अशा सवयी लावल्यानंतर तुम्ही प्रत्येकाशी वाईट बोलणार असाल, तर कोणीही तुमच्यासोबत काम करणार नाही. आम्ही तुला चित्रपट ऑफर केला होता, तू नकार दिलास. तू स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतलास." सलमानने अप्रत्यक्षपणे सांगितले की, अभिनवच्या सततच्या टीका-टिप्पणीनेच त्याचे करियर जास्त खराब झाले आहे.
advertisement
"मी दररोज 'त्याच्या'साठी गुडघे टेकतो!"
यानंतर शेवटी सलमानने अभिनवला एक सल्ला दिला. सार्वजनिक भांडणांऐवजी सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्याने केले. सलमान खान म्हणाला, "कोणाच्या कुटुंबाच्या मागे लागायचं असेल, तर स्वतःच्या कुटुंबाच्या मागे लागा. त्यांच्यावर प्रेम करा, बायको-मुलांची काळजी घ्या." सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अभिनवच्या 'गुडघे टेकावे लागतील' या विधानाला उत्तर देताना सलमान म्हणाला, "मी दररोज सकाळी गुडघ्यावर येतो, पण फक्त देवाकडे प्रार्थना करण्यासाठी!"
advertisement
काय होता अभिनव कश्यपचा वादग्रस्त आरोप?
सलमानने अनुराग कश्यपच्या 'निशांची' चित्रपटाचे जाहीर कौतुक केल्यानंतर अभिनव कश्यपने संताप व्यक्त केला होता. अभिनवने एका मुलाखतीत म्हटले होते, "सलमानच्या नशिबात लिहिले आहे की, आता तो आमचे तळवे चाटेल. मी त्याला गुंड म्हटले होते, आता तो आमचा प्रशंसक बनत आहे." २०२० पासून अभिनव कश्यप सतत सलमान आणि त्याच्या कुटुंबावर आपले करियर खराब केल्याचे आरोप करत आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 13, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
'मी गुडघे टेकतो... पण तुला काम मिळालं का?'; सलमान खानने केला अभिनव कश्यपचा पर्दाफाश, सगळंच बाहेर काढलं