Cyber Fraud: सायबर फ्रॉडचा नवा फंडा, वॉशिंग मशीन दुरुस्तीच्या नावाखाली लुटलं; सराफाचं दिवाळं निघालं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
ऑटो डाउनलोड सेटिंगचा जळगावात एका व्यक्तीला बसला असून तब्बल साडेचार लाखांची फसवणूक झाली आहे.
जळगाव : गेल्या काही वर्षांत ऑनलाइन व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. ऑनलाइन व्यवहाराचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेदेखील आहेत. एकीकडे अशा व्यवहारांकडे कल वाढत असताना, दुसरीकडे सायबर गुन्हेगारीचं प्रमाणही वाढत आहे. ऑनलाइन फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार सातत्यानं नवनवीन पद्धती शोधत असतात. जळगावात ऐन दिवाळीत मोठी फसवणूक झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. घरातील वॉशिंग मशिन दुरुस्तीसाठी सर्व्हिस सेंटरला कॉल केला, त्यानंतर एक एपीके फाईल मोबाईलवर आली अन् दोन दिवसात व्यक्तीच्या मोबाईलमधून जवळपास पाच लाख रुपये गायब झाले.
समोर आलेल्य माहितीनुसार, निलेश सराफ यांनी काही दिवसांपूर्वी खरेदी केलेल्या वॉशिंग मशीनमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी संबंधित कंपनीच्या सर्व्हिस सेंटरला दुरुस्तीसाठी फोन केला. त्यानंतर सराफ यांना एका व्यक्तीकडून कॉल आला आणि त्याने मशीन दुरुस्तीसाठी ओटीपी मागितला. कंपनीकडून फोन आला आहे, असा समज करून सराफ यांनी तो ओटीपी सांगितला. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ६५ हजार रुपये काढले गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.
advertisement
हॅकरने मोबाईल हॅक करून केली फसवणूक
फसवणूक झाल्याची जाणीव होताच सराफ यांनी तात्काळ सायबर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला असून या घटनेचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक नितीन गणपुरे यांनी दिली.ऑटो डाऊनलोड सेटिंग सुरू असल्याने हॅकरने मोबाईल हॅक करून फसवणूक केल्याचे समोर आले आहे.
advertisement
ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये
सायबर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, कोणालाही ओटीपी, बँक तपशील किंवा मोबाईलवरील डाउनलोड लिंक देऊ नये. तसेच मोबाईलमधील ऑटो डाउनलोड सेटिंग बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मोबाईल आणि इंटरनेट वापरणाऱ्या सर्वांसाठी एक इशारा आहे. या घटनेवरून स्पष्ट होते की, लोकांनी अशा अनोळखी कॉलची काळजी घ्यावी आणि कोणत्याही परिस्थितीत ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती शेअर करू नये.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
October 13, 2025 3:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Cyber Fraud: सायबर फ्रॉडचा नवा फंडा, वॉशिंग मशीन दुरुस्तीच्या नावाखाली लुटलं; सराफाचं दिवाळं निघालं