Video: 'नाशिक आहे भावा, इज्जत दे नाहीतर...' गुन्हेगारी स्टाईल रिल्स बनवणाऱ्या तरुणींचा पोलिसांनी उतरवला माज, खाक्या दाखवताच बदलली भाषा

Last Updated:

महिला असो की पुरुष कायद्याचे उल्लंघन केले तर फटके पडणारच, असे नाशिक पोलीसांनी म्हटले आहे.

नाशिक : नाशिक शहरात गेल्या 9 महिन्यात 46 खुनाच्या घटना घडल्यानंतर नाशिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या आहेत. पोलिसांना आव्हान देणाऱ्या पोस्ट, रीलसह गुन्हेगारी घटनांवर धारित व्हिडीओ आणि रील्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी गुन्हेगारी स्टाइलमध्ये रील तयार करून प्रसिद्धी मिळवणाऱ्या एका तरुणावर पोलिसांनी कारवाई केली होती. त्यानंतर आता दोन तरुणींनी तयार केलेला धमकीवजा रील सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या तरूणींना नाशिक पोलिसांनी चांगला धडा शिकवला आहे.
नाशिकमधील दोन तरुणींनी सोशल मीडियावर धमकी देणारा एक रील तयार करून पोस्ट केली होती. 'हे नाशिक आहे भावा, तू येथे इज्जत दिली तर तुला इज्जतच भेटेल, नाही तर तुझी डेड बॉडी डायरेक्ट सिविलला भेटंल' #नाशिक असे या रीलमध्ये म्हटले आहे. या वक्तव्यानंतर रील झपाट्याने व्हायरल झाला आणि त्यावरून मोठी चर्चा रंगली. रीलमध्ये गुन्हेगारी आणि धमकीचा सूर असल्याने पोलिसांनी या व्हिडीओची गंभीर दखल घेतली.
advertisement

नाशिक पोलिसांनी शिकवला धडा

नाशिक पोलिसांच्या सायबर सेल आणि स्थानिक पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई करत या दोन्ही तरुणींना शोधून ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याकडून चौकशी केली असून अशा प्रकारे समाजात भीती निर्माण करणारे किंवा गुन्हेगारी वर्तनाचे प्रदर्शन करणारे रील्स तयार करणे कायद्याने गुन्हा असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी धडा शिकवण्यासाठी या मुलींचा एक व्हिडीओ तयार केला यामध्ये स्वत: त्या मुलींनी असे व्हिडीओ न करण्याचे आवाहन केले आहे. महिला असो की पुरुष कायद्याचे उल्लंघन केले तर फटके पडणारच, असे नाशिक पोलीसांनी म्हटले आहे.
advertisement

नाशिक पोलिसांच्या कारवाईचे कौतुक

नाशिक पोलिसांनी याप्रकरणी इशारा दिला आहे की, सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा रील्स तयार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. 'खाकी दाखवतात नाशिक जिल्हा कायद्यांचा बालेकिल्ला आहे,' असे उद्गार पोलिसांनी काढत नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, नाशिक पोलिसांच्या कारवाईचे कौतुक नागरिकांकडून होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Video: 'नाशिक आहे भावा, इज्जत दे नाहीतर...' गुन्हेगारी स्टाईल रिल्स बनवणाऱ्या तरुणींचा पोलिसांनी उतरवला माज, खाक्या दाखवताच बदलली भाषा
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement