तो 60 वर्षांचा, ती 40 वर्षांची! लग्नानंतर म्हणाली, 'आज तुला सोडणार नाही'; व्यक्तीचा मृत्यू
- Published by:Priya Lad
Last Updated:
60 Year old man died after married 40 year old woman : पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर 4 वर्षांनी 60 वर्षांच्या धनजीभाईने 20 वर्षांनी लहान महिलेशी लग्न केलं. पण या लग्नानंतर धनजीभाईचा मृत्यू झाला आहे.
अहमदाबाद : 60 वर्षांचा धनजीभाई उर्फ खिमजीभाई विश्रामभाई केराई (पटेल) यांच्या पहिल्या पत्नीचा 4 वर्षांपूर्वी मृत्यू झाला. त्यांना तीन मुलं, पण तिघंही परदेशात राहतात. एक मुलगा काही दिवसांपूर्वीच इथं आला होता. ते एकटेच राहत होते. एकाकीपणात त्यांना एका जोडीदाराची गरज वाटली म्हणून दीड वर्षांपूर्वी त्यांनी दुसरं लग्न केलं. त्यांची दुसरी बायको, 40 वर्षांची त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी लहान. पण या लग्नानंतर धनजीभाईचा मृत्यू झाला आहे.
गुजरातच्या कच्छमधील ही घटना भुजच्या समत्रा गावातील. धनजीभाईची दुसरी बायको तिचंही हे दुसरं लग्न होतं. पहिल्या पतीसोबत तिचा घटस्फोट झाला होता. धनाजीभाईंशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्या पहिल्या मृत पत्नीचे 18 तोळे दागिने स्वतःला घेतले. या दोघांच्या लग्नाला दीड वर्षे उलटली होती.
advertisement
एके दिवशी धनजीबाईच्या बायकोने त्याच्याकडे पैसे मागितले त्याने दिले नाहीत, म्हणून ती भडकली. आज तुला जिवंत सोडणार नाही, असं म्हणत ती नवऱ्याला घराच्या गॅरेजमध्ये घेऊन केली. तिथं तिने रॉकेल ओतलं आग लावली आणि गॅरेजचा दरवाजा बंद करून ती वर घरात निघून गेली.
गॅरेजमधून आगीचा धूर बाहेर आला, ओरडण्याचा आवाज येऊ लागला म्हणून आजूबाजूचे लोक तिथं धावत आले. त्यांनी पाहिलं तर धनजीभाई आगीच्या विळख्यात होते. त्यांना तात्काळ भुजच्या के जी जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांचा वाचवण्याचे सगळे प्रयत्न केले पण ते अपयशीस ठरले. धनजीभाईला वाचवता आलं नाही, त्याचा मृत्यू झाला.
advertisement
मृत्यूआधी त्याने पोलिसांना माहिती दिली. पत्नीने जिवंत जाळल्याचं त्याने सांगितलं. मनकुवा पोलिसांनी त्याच्या पत्नीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली, अशी माहिती कच्छचे डीवायएसपी मिनेष क्रिश्चियन यांनी दिली.
view commentsLocation :
Gujarat
First Published :
October 13, 2025 3:15 PM IST
मराठी बातम्या/Viral/
तो 60 वर्षांचा, ती 40 वर्षांची! लग्नानंतर म्हणाली, 'आज तुला सोडणार नाही'; व्यक्तीचा मृत्यू