तरुणीचं किस, गालावर राहिले लिपस्टिकचे निशाण; पाहून जया बच्चन यांनी असं काही केलं... अमिताभ आजही विसरले नाहीत
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Amitabh Bachchan-Jaya Bachchan : अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्याशी संबंधित काही अत्यंत मजेशीर आणि खासगी किस्से उघड केले, ज्यात जयाजींचा टिपिकल पत्नीवाला स्वभाव दिसून आला.
मुंबई: बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस ११ ऑक्टोबरला असतो. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी 'कौन बनेगा करोडपती १७' (KBC 17) च्या विशेष एपिसोडमध्ये फरहान आणि जावेद अख्तर यांनी बिग बींसोबत धमाल केली.
advertisement
याच वेळी अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन यांच्याशी संबंधित काही अत्यंत मजेशीर आणि खासगी किस्से उघड केले, ज्यात जयाजींचा टिपिकल पत्नीवाला स्वभाव दिसून आला.
advertisement
फरहान अख्तरने अमिताभ बच्चन यांना विचारले की, त्यांची कोणती एक सवय जयाजींना अजिबात आवडत नाही? यावर बिग बींनी उत्तर दिले की, "जयाजींना कोणती कथा आहे, कोणती अभिनेत्री आहे किंवा चित्रपट कोणता आहे, याचा फरक पडत नाही. त्यांना काही आवडले नाही, तर त्या थेट बोलून दाखवतात!"
advertisement
त्यांनी 'लावारिस' चित्रपटातील गाण्याचा किस्सा सांगितला. 'मेरे अंगने में' या गाण्याच्या शूटिंगदरम्यान मी गाण्यात वर्णन केलेल्या स्त्रियांप्रमाणे परफॉर्म करण्याचा विचार केला. चित्रपटाच्या ट्रायल स्क्रीनिंगमध्ये, जेव्हा हे गाणे लागले, तेव्हा जयाजी रागारागाने उठून निघून गेल्या! त्या नंतर मला खूप ओरडल्या आणि विचारले, "तुम्ही असे गाणे कसे करू शकता?"
advertisement
बिग बींनी जयाजींच्या टिपिकल पत्नी स्वभावाचा आणखी एक किस्सा सांगितला. १५ वर्षांनंतर, याच गाण्यावर मी एका अवॉर्ड फंक्शनमध्ये परफॉर्म करत होतो. त्यांनी गाण्यातील ओळी दर्शवण्यासाठी स्टेजवर काही महिलांना बोलावले. त्या महिला डान्स करण्यासाठी आल्या, काहींनी मला मिठी मारली, तर काहींनी किस केले.
advertisement
गाण्यातील शॉर्ट असलेल्या स्त्रीच्या ओळी आल्यावर मी कोणालाच न बोलावता थेट जयाजींना स्टेजवर उचलून घेतले! कारण गाण्यात ओळ होती - 'गोद में उठा लो, बच्चे का क्या काम है'
advertisement
मी विचार केला की माइक लावलेला आहे, तर जयाजीही काहीतरी बोलतील. पण, त्यांनी फक्त माझ्या चेहऱ्यावरील लिपस्टिकचे डाग पुसणे सुरू केले! बिग बी म्हणाले, "त्यांना स्टेजवरील बाकी काही दिसले नाही, फक्त लिपस्टिकच्या खुणांची चिंता होती! अगदी टिपिकल बायकांसारखं!"
advertisement