Diwali 2025 : दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार, संपूर्ण Making Video

Last Updated:

दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकात्मतेचा सण. या काळात प्रत्येक घरात दिव्यांची आरास केली जाते. ज्यामुळे वातावरण तेजोमय आणि उत्साही बनते. 

+
Diwali

Diwali 2025

अमरावती: दिवाळी म्हणजे प्रकाश, आनंद आणि एकात्मतेचा सण. या काळात प्रत्येक घरात दिव्यांची आरास केली जाते, ज्यामुळे वातावरण तेजोमय आणि उत्साही बनते. परंतु सध्या बाजारात मिळणाऱ्या कृत्रिम दिव्यांमुळे प्रदूषण वाढण्याची शक्यता असते. तसेच तेल किंवा तुपाने दिवे लावताना तेलाची नासाडीही होते. अशा वेळी पर्यावरणपूरक आणि सुगंधित दिवे तयार करणे हा उत्तम पर्याय ठरतो. हे दिवे केवळ सौंदर्य वाढवत नाहीत तर घरात नैसर्गिक सुगंधही निर्माण करतात. चला तर जाणून घेऊया, अशा नैसर्गिक सुगंधी दिव्यांची निर्मिती कशी करावी आणि त्याचे फायदे काय आहेत.
सुगंधित दिवे बनविण्यासाठी लागणारे साहित्य
मेणबत्ती ही ओरिजनल मेण वापरून बनवलेली असेल तर अधिक चांगले राहील. मेणबत्तीऐवजी तुम्ही याठिकाणी वनस्पती तूप किंवा तूप वापरू शकता. लक्ष्मीपूजनासाठी बनवत असल्यास घरगुती तूप वापरा. बाहेरील ठिकाणी लावण्यासाठी मेणबत्ती आणि वनस्पती तूप वापरू शकता. त्यानंतर लिंबाचा रस, एखादे सुगंधित तेल, फुलवाती आणि आपल्याला ज्या आकारात दिवे तयार करायचे आहेत त्या आकाराचे कोणतेही भांडे चालेल. अगदी छोटे स्टील, जर्मन भांडे वापरून देखील हे दिवे तुम्ही बनवू शकता.
advertisement
दिवे कसे तयार करायचे?
सर्वात आधी मेणबत्ती वितळून घ्यायची आहे. मेणबत्ती पूर्णतः वितळून झाली की, त्यातील धागा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये सुगंधित तेल टाकून घ्यायचं आहे. ते त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. लिंबाचा रस त्यात व्यवस्थित मिक्स होऊ द्यायचा आहे, जेणेकरून लिंबातील पाणी त्यात शोषून घेतले जाईल. त्यानंतर मिश्रण तयार झाले असेल. आता ते मिश्रण आइस ट्रेमध्ये टाकून घ्यायचं आहे. त्यासाठी एका परातीत पाणी टाकून घ्या.
advertisement
त्यानंतर त्यावर ट्रे ठेवा. त्यानंतर एक एक करून संपूर्ण वाती ओल्या करून हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. मिश्रण टाकून झाल्यानंतर हे सेट होऊ द्यायचं आहे. बाहेर ठेवल्यास अर्धा तासात हे पूर्ण सेट होईल. तसेच तुम्ही हे फ्रिजमध्ये ठेवून देखील सेट करू शकता. फ्रीजमध्ये ठेवल्यास 15 मिनिटात हे दिवे सेट होतील. छान पाहिजे तशा आकारात तुम्ही दिवे तयार करू शकता. हे दिवे घरात लावल्यानंतर छान सुगंध पसरतो. तसेच तेल दिव्यात टाकतांना तेलाची नासाडी होईल असंही काहीच टेन्शन नाही. तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता, घरगुती सुगंधित दिवे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Diwali 2025 : दिवाळीला बनवा घरच्या घरी सुगंधित दिवे, अगदी झटपट होतील तयार, संपूर्ण Making Video
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement