Marathwada Weather : मराठवाड्यात वार फिरलं, पुन्हा पाऊस कोसळणार, 3 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
मराठवाड्यात आज हवामानात बदल दिसून येणार असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1/5
मराठवाड्यात आज हवामानात बदल दिसून येणार असून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नांदेड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.

advertisement
2/5
तर उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, काही ठिकाणी अधूनमधून विजांच्या कडकडाटासह हलक्या सरींचा अनुभव येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना हवामानातील या बदलाचा विचार करून सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

3/5
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आज मराठवाड्यातील कमाल तापमान 31 ते 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील, तर किमान तापमान 16 ते 18 अंशांच्या दरम्यान असणार आहे. संभाजीनगरमध्ये तापमान 33 अंशांपर्यंत पोहोचेल, तर लातूर, नांदेड आणि धाराशिव येथे तापमान 30 ते 32 अंशांच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

4/5
'ऑक्टोबर हिट'चा परिणाम अजूनही कायम असून, तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ झालेली दिसते. दुपारच्या वेळेत उष्णता वाढलेली असली तरी संध्याकाळी हवेत गारवा जाणवेल. या दरम्यान पडणाऱ्या सरींमुळे वातावरणात किंचित आर्द्रता वाढेल आणि काही ठिकाणी धुक्याचाही अनुभव येऊ शकतो.

5/5
दरम्यान, शेतकऱ्यांसाठी हे हवामान मिश्र स्वरूपाचे ठरणार आहे. पावसामुळे काही ठिकाणी पिके ओलसर होण्याची शक्यता असली, तरी बीड, परभणी आणि हिंगोली परिसरातील शेतांना थोडी आर्द्रता मिळून पिकांच्या वाढीस हातभार लागेल. हवामान विभागाने पुढील दोन दिवस परिस्थिती सारखी राहील असा अंदाज वर्तवला आहे.

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement