Naxal Leader Bhupati Surrender : मोठी बातमी! माओवादी चळवळीचा कणा मोडला, चळवळीच्या 'ब्रेन'चे सरेंडर, 60 नक्षलींसह शरणागती

Last Updated:

Naxal Leader Bhupati Surrender : माओवादी चळवळीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी धक्कादायक आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणेला दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे.

Naxal Leader Bhupati Surrender
Naxal Leader Bhupati Surrender
महेश तिवारी, प्रतिनिधी, गडचिरोली: माओवादी चळवळीच्या इतिहासातील सगळ्यात मोठी धक्कादायक आणि देशाच्या सुरक्षा यंत्रणेला दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. माओवाद्यांच्या संघटनेत सर्वोच्च असलेला 40 दशकं माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी ओळख असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने सुरक्षा यंत्रणांसमोर शस्त्र टाकले आहेत. भूपती हा संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नेता ओळखला जातो. भूपतीसोबत 60 माओवाद्यांनी देखील आत्मसमर्पण केले आहे. या घटनेमुळे माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
नक्षली नेता भूपती याने 60 माओवाद्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर रात्री उशिरा आत्मसमर्पण केल्याची माहिती आहे. 1970 च्या दशकात माओवादी संघटना पीपल्स वर ग्रुप मध्ये प्रवेश करणारा वेणूगोपाल उर्फ भूपती याची कारकीर्द गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा तालुक्यातून सुरू झाली. मोठा माओवादी नेता मल्लोजुला कोटेश्वरराव उर्फ किशनजी याचा भूपती हा लहान भाऊ आहे. संपूर्ण देशभरात 6 कोटीपेक्षा अधिक बक्षिसाची रक्कम भूपतीवर जाहीर करण्यात आली होती.
advertisement
माओवाद्यांच्या संपूर्ण संघटने संदर्भात असलेल्या धोरणांमध्ये बौद्धिक चेहरा म्हणून भूपतीने मोठी भूमिका बजावली आहे. अनेक मोठ्या हिंसक घटना ज्या घडलेल्या आहेत त्यांसह माओवाद्यांच्या संघटनेची स्थानिक पातळी पासून केंद्रीय समितीपर्यंत आखणी करण्यात, त्यात वेळोवेळी बदल करण्यात भूपतीची मोठी भूमिका राहिली आहे. अभय नावाने भूपती कडून अनेकदा पत्रकही जारी करण्यात आली आहेत. भूपती हा माओवादी संघटनेच्या इतिहासातील मोठा चेहरा आहे..
advertisement
युद्धबंदी आणि शांतता चर्चा करण्यासंदर्भात तसेच शस्त्रे टाकण्या संदर्भात सगळ्यात अगोदर भूपतीने वक्तव्य केलं होतं. त्यावर माओवादी नेतृत्वाने तीव्र शब्दात टीका केल्यानंतर माओवादी संघटनेतील फूट जाहीर झाली होती. गडचिरोली पोलिसांचा हे मोठे यश असून भूपतीला आत्मसमर्पण घडवण्यामध्ये काही दिवसापासून पोलिसांचे प्रयत्न सुरू होते.. त्यात त्यांना यश आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Naxal Leader Bhupati Surrender : मोठी बातमी! माओवादी चळवळीचा कणा मोडला, चळवळीच्या 'ब्रेन'चे सरेंडर, 60 नक्षलींसह शरणागती
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement