Alcohol : दारू पिताना लोक सर्वात जास्त कोणत्या 5 चुका करतात? हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
5 common mistakes people do while drink alcohol : दारू पिण्याची योग्य पद्धत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याची माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. अशा कोणत्या त्या 5 चूका आहेत ज्या सामान्यता लोक करतात चला जाणून घेऊ.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव कमी करण्यासाठी किंवा सामाजिक समारंभात अनेक जण अल्कोहोलचे सेवन करतात. दारु आरोग्यासाठी हानिकारक आहे असं डॉक्टर वारंवार सांगतात. पण असं असलं तरी देखील लोक त्याकडे कानाडोळा करतात. आता तर वर्ष संपायला आलं आहे. त्यामुळे सगळीकडे ख्रिसमस आणि पार्टीचा माहोल आहे. त्यामुळे लोक आता सर्वाधिक दारुचं सेवन करतात. पण असं करताना काही गोष्टी टाळल्या तर त्यामुळे पुढे होणारे परिणाम कमी करता येतं.
advertisement
advertisement
1. पाण्याऐवजी कोल्ड्रिंक्सचा जास्त वापरअनेकजण दारूमध्ये कोल्ड्रिंक्स (Soft Drinks) किंवा फ्रूट ज्यूस मिसळून पितात. ही सर्वात मोठी चूक आहे.साखर असलेले पेय शरीरात अल्कोहोलचे शोषण जलद करतात, ज्यामुळे नशा लवकर चढते.मग योग्य काय?दारू पिताना नेहमी साधे पाणी किंवा सोडा पिण्यास प्राधान्य द्या. यामुळे शरीरातील पाणी पातळीटिकून राहते.
advertisement
2. रिकाम्या पोटी दारू पिणेअल्कोहोल सेवन करण्यापूर्वी पुरेशी आणि पौष्टिक जेवण न करणे, ही दुसरी सर्वात मोठी चूक आहे.रिकाम्या पोटी दारू प्यायल्यास अल्कोहोलचे शोषण लगेच सुरू होते आणि नशा खूप लवकर चढते. यामुळे गॅस्ट्रिक समस्याआणि अल्कोहोल पॉयझनिंगचा धोका वाढतो.दारू पिण्यापूर्वी प्रोटीन आणि फॅटयुक्त (उदा. पनीर, नट्स, चीज) पदार्थ खावेत. यामुळे अल्कोहोलचे शोषण मंदावते.
advertisement
3. 'शॉट्स' जलद घेणेएकापाठोपाठ एक 'शॉट्स' घेणे किंवा खूप जलद गतीने ड्रिंक्स संपवणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे.यकृताला अल्कोहोल पचवण्यासाठी वेळ मिळत नाही. यामुळे रक्तातील अल्कोहोलची पातळी अचानक वाढते, ज्यामुळे नियंत्रण सुटते.त्यामुळे प्रत्येक ड्रिंकनंतर विश्रांती घ्या आणि पाणी प्या. शरीराला अल्कोहोलवर प्रक्रिया करण्यासाठी वेळ द्या.
advertisement
advertisement
5. औषधे घेऊन दारू पिणेडॉक्टरांनी दिलेली औषधे किंवा कोणत्याही प्रकारच्या पेनकिलर सोबत दारू पिणे हे सर्वात गंभीर आणि धोकादायक ठरू शकते.अनेक औषधे आणि अल्कोहोलची प्रतिक्रिया होऊन त्याचे गंभीर दुष्परिणाम होतात. काही प्रकरणांमध्ये हे मिश्रण यकृत निकामी होण्यास किंवा श्वासोच्छ्वास थांबण्यास कारणीभूत ठरू शकते.कोणताही उपचार चालू असताना किंवा कोणतीही औषधे घेत असताना अल्कोहोल पूर्णपणे टाळा.
advertisement










