नाव देशभरात गाजलं, मतं मिळाली नाहीत; भाजपाच्या सोनिया गांधींचा मुन्नारमध्ये पराभव, नावाचं राजकारण फसलं
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
BJP Kerala Sonia Gandhi Lose Election: केरळच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये चर्चेत आलेल्या भाजपाच्या उमेदवार सोनिया गांधी यांना मुन्नारमधील नल्लाथन्नी वॉर्डात पराभव स्वीकारावा लागला आहे. नावामुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेल्या या लढतीचा निकाल अखेर एलडीएफच्या बाजूने लागला.
advertisement
advertisement
हा पराभव केवळ एका वॉर्डापुरता मर्यादित नाही, तर नाव, राजकीय वारसा आणि विचारधारा यांचा अनोखा संघर्ष दाखवणारी राजकीय कथा ठरली आहे. मुन्नारमधील नल्लाथन्नी वॉर्ड (वॉर्ड क्रमांक 16) मधून भाजपाच्या सोनिया गांधी यांनी निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर डाव्या आघाडीच्या (एलडीएफ) उमेदवार वलारमती होत्या. मतमोजणीत वलारमती यांनी आघाडी घेत सोनिया गांधींचा पराभव केला.
advertisement
advertisement
सोनिया गांधी यांचा जन्म काँग्रेसशी जुना संबंध असलेल्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील दिवंगत दुरैराज हे काँग्रेसचे स्थानिक स्तरावरील ज्येष्ठ नेते होते आणि नल्लाथन्नी–कल्लार परिसरात त्यांची ओळख होती. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याविषयी आदर असल्यानेच त्यांनी आपल्या मुलीचे नाव सोनिया गांधी ठेवले होते.
advertisement
advertisement
दरम्यान केरळमध्ये 1,199 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू आहे. सुरुवातीच्या कलानुसार ग्रामीण भागात एलडीएफ, तर शहरी भागात यूडीएफची आघाडी दिसत आहे. हे निकाल 2026 च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी सेमीफायनल मानले जात आहेत. या पार्श्वभूमीवर सोनिया गांधी यांचा पराभव एका छोट्या वॉर्डपुरता असला तरी त्याची चर्चा मात्र राज्याबाहेरही होत आहे.









