पिंट्या, बब्लू, राणी..., धनगर राजू आवाज देताच हजारो मेंढ्यातून लगेच येतात बाहेर, VIDEO
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
लहान मुलांप्रमाणे मेंढ्यांना सुद्धा टोपण नावे दिले आणि लॉक म्हणजे कानाला खुणा केल्या जातात. तसेच मेंढ्यांच्या चेहऱ्यावरून नावे ठेवतात किंवा शरीरावरच्या खुणा यावरून हे मेंढी पालन करणारे आपल्या मेंढ्या ओळखतात.
शेतमाल रिकामी झाली की, धनगर आपल्या मेंढ्या घेऊन गावोगावी शेतमालात फिरताना दिसतात. ही परंपरा काही वर्षांपासून असल्याचे सांगितले जाते. रात्रभर मेंढ्या शेतात बसवायच्या, त्यातच प्रत्येकाकडे 200 ते 500च्या वर मेंढ्या असतात त्यातूनच मेंढीपालन आपल्या मेंढ्या ओळखण्याची पद्धत जणू आपल्याला आकर्षित करते. लहान मुलांप्रमाणे मेंढ्यांना सुद्धा टोपण नावे दिले आणि लॉक म्हणजे कानाला खुणा केल्या जातात. तसेच मेंढ्यांच्या चेहऱ्यावरून नावे ठेवतात किंवा शरीरावरच्या खुणा यावरून हे मेंढी पालन करणारे आपल्या मेंढ्या ओळखतात.
महत्वाचे म्हणजे मेंढ्यांचे आवाज हे खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात. या आवाजावरून मेंढीला नक्की काय होत आहे किंवा मेंढीला नक्की काय पाहिजे हे कळते. मेंढका किंवा मेंढ्यांमधील कामाचा दीर्घ अनुभव असलेले मेंढपाळ तसेच पशुधन पर्यवेक्षक मेंढ्यांच्या आवाजावरून ही गरज ओळखू शकतात. आपण सकाळी मेंढ्यांना गोळी पेंड टाकतो तेव्हा गोळी पेंड ठेवलेल्या खोलीत गेल्यापासून ते गोळी पेंड गव्हाणीत पडेपर्यंत सर्वच मेंढ्या मोठमोठ्याने कर्कश आवाजात ओरडत असतात. आवडीचे खाद्य असल्यामुळे ते मिळेपर्यंत मेंढ्या खूप मोठ्याने ओरडत असतात.
advertisement
गेल्या अनेक पिढ्यांपासून राजू ठोंबरे हे मेंढ्यापालन करतात.बोलले तर हा त्यांचा व्यवसाय असून त्यांच्याच कुटुंबाचा भाग म्हणून या 400 ते 500 मेंढ्या आहेत. त्यांना वाढवणे आणि पैसे कमी पडले की तरच त्यांना बाजारात विकायच्या असा हा त्यांचा दरवर्षी नियोजन असतो. त्यांनी वाढवलेल्या मेंढ्यांना ते विविध नावाने ओळखतात. काहीच कान मोठे लहान असतील त्यावरून नाव ठेवतात तर काहींच्या पाठीच्या कण्यावरून नाव ठेवतात. डोळे, पाय शरीराच्या सर्व भागात वरून मेंढ्यांना नवे ठेवल्याचे या वेळी दिसून आले. ते जेव्हा आवाज देऊन मेंढ्यांना बोलावतात तेव्हा चक्क त्या नावाची मेंढी तिथे हजर राहते.
advertisement
एवढा जीव आणि आपुलकी त्या मेंढ्यात बघायला मिळते. ठोंबरे कुटुंबीय जेव्हा मेंढ्या वाढवतात आणि विकायची वेळ येते तेव्हा एखादी मुलगी सासरी जायला निघते तेवढे त्यांचे हात जड होतात त्यांना विकण्यासाठी त्यामुळे त्यांनी जन्मापासून तीन मेंढे त्यांच्या सोबतच ठेवले आहेत. त्यांना कधीच विकणार नाहीत हे ही त्यांनी यावेळी सांगितले.जे प्रेम माणसांत बघायला नाही मिळत ते या प्राण्यांमध्ये बघायला मिळत.त्यामुळे बोलले जाते माणसावर प्रेम केले तर ते धोका देतात पण प्राणी गरजेला साथ देतात.हे आपल्याला या मेंढ्यामधून नक्कीच बघायला मिळाले.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
December 13, 2025 8:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पिंट्या, बब्लू, राणी..., धनगर राजू आवाज देताच हजारो मेंढ्यातून लगेच येतात बाहेर, VIDEO










