गोंदियाच्या नक्षली चळवळीला मोठा हादरा, ३ बड्या माओवाद्यांचं आत्मसमर्पण
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
रवी सपाटे, प्रतिनिधी, गोंदिया: गोंदिया जिल्ह्यातील नक्षली चळवळीला मोठा हादरा बसला असून 'मोस्ट वॉन्टेड' तीन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तिन्ही नक्षलवादी दरेकसा एरिया कमिटीचे सदस्य होते. विदर्भातील विशेषत: मध्य प्रदेश, छत्तीसगडला लागून असलेल्या जिल्ह्यातील नक्षलवादाचा बिमोड वेगाने करण्यात सरकारला यश येत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून हातातील शस्त्र खाली टाकून संविधानाची कास धरून नक्षलवादी आत्मसमर्पण करीत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कुख्यात नक्षलवादी भूपती, तारक्का यांनी आत्मसमर्पण केले. यापूर्वी ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
गोंदिया जिल्ह्यात २८ नोव्हेंबर रोजी ११ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर दरेकसा एरिया कमिटीचे काही उर्वरित सदस्य आत्मसमर्पण करण्यात बाकी होते. त्यासाठी गोंदिया पोलीस नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करावे यासाठी प्रयत्नशील होते. दरेकसा एरिया कमिटीचे कमांडर रोशन बेडजा 35 वर्ष, याच्यासह सुभाष रव्वा 26 वर्ष, रतन पोयाम 25 वर्ष अश्या तीन नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांच्या समोर आत्मसर्पण केले.
advertisement
या तिन्ही नक्षलवाद्यांवर वीस लाखाचे बक्षीस होते. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील नक्षली चळवळीला मोठा हादरा बसलाय. गोंदिया जिल्ह्यातील नक्षल चळवळ आता नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून येते.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Dec 13, 2025 8:48 PM IST










