World Cup : टीम इंडियाची वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धडक, हरमनच्या पोरींनी किवींना चिरडलं!

Last Updated:

लागोपाठ 3 पराभव झाल्यानंतर महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची गाडी विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. हरमनप्रीतच्या महिला ब्रिगेडने करो या मरो सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली आहे.

टीम इंडियाची वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धडक, हरमनच्या पोरींनी किवींना चिरडलं!
टीम इंडियाची वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धडक, हरमनच्या पोरींनी किवींना चिरडलं!
नवी मुंबई : लागोपाठ 3 पराभव झाल्यानंतर महिला वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची गाडी विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. हरमनप्रीतच्या महिला ब्रिगेडने करो या मरो सामन्यात न्यूझीलंडला धूळ चारली आहे, याचसोबत भारताने सेमी फायनलमध्येही धडक मारली आहे. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडला 44 ओव्हरमध्ये 271/8 पर्यंतच मजल मारता आली, त्यामुळे भारताचा 53 रननी विजय झाला आहे.
प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना यांच्या शतकांच्या जोरावर भारताने 340 रनपर्यंत मजल मारली. प्रतिकाने 122 तर स्मृतीने 109 रनची खेळी केली. या दोघांमध्ये 212 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली. तर जेमिमा रॉड्रिग्जने 55 बॉलमध्ये 76 रन केले. पावसामुळे टीम इंडियाला 49 ओव्हरच बॅटिंग करण्यात आली, ज्यात त्यांनी 3 विकेट गमावून 340 रन केल्या. यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडला 44 ओव्हरमध्ये 325 रनचं आव्हान मिळालं.
advertisement
भारताकडून रेणुका सिंग ठाकूर आणि क्रांती गौड यांना 2-2 विकेट मिळाल्या. याशिवाय स्नेह राणा, श्री चरणी, दीप्ती शर्मा आणि प्रतिका रावल यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. न्यूझीलंडकडून ब्रुक हलिडेने सर्वाधिक 81 रन केले, तर इसाबेला गेझने 65 रनची खेळी केली.

टीम इंडिया सेमी फायनलमध्ये

न्यूझीलंडला पराभूत करून टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक दिली आहे, पण टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधला आणखी एक सामना शिल्लक आहे. 26 ऑक्टोबरला भारत आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे. सेमी फायनलआधी या सामन्यात चुका सुधारण्याची टीम इंडियाकडे संधी आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या तीन टीम आधीच सेमी फायनलला क्वालिफाय झाल्या होत्या, त्यानंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चौथ्या स्थानासाठी स्पर्धा होती. आता न्यूझीलंडचा पराभव केल्यानंतर भारत वर्ल्ड कप सेमी फायनलला पोहोचणारी चौथी टीम ठरली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
World Cup : टीम इंडियाची वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये धडक, हरमनच्या पोरींनी किवींना चिरडलं!
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement