ठाणे : ठाण्यातील स्टार फिष स्पोर्ट फाउंडेशनचा 12 वर्षे जलतरणपटू आयुष तावडे या ठाणेकर बालकाने ठाणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. आयुष याने एका स्पर्धेत 81 किलोमीटर हे सागरी अंतर अवघ्या 12 तासात पूर्ण केले आहे.
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या या स्पर्धेत जगातील एकूण 18 खेळाडूंमध्ये आयुषने 12 तासात हा कठीण सागरी प्रवास पूर्ण केला. त्या 18 जणांमध्ये हा वयाने सगळ्यात लहान स्पर्धक होता. त्यामुळे या विश्वविक्रमामुळे फक्त ठाण्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातूनच आयुषवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
advertisement
1 सप्टेंबरला ही जलतरण स्पर्धा पश्चिम बंगालमध्ये पार पडली. जगातील सर्वात लांब, 81 किमी खुल्या पाण्याची राष्ट्रीय जलतरण स्पर्धा भागीरथी नदी, मुर्शिदाबाद, पश्चिम बंगाल येथे आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ठाण्यातील आयुष तावडे याने 81 किमी पोहण्यात 12 तास 20 मिनिटे वेळ देऊन या स्पर्धेत 5वा क्रमांक पटकावला आहे.
ना तेल ना मसाला, चवीसह आरोग्यसाठीही फायदेशीर, अगदी पटकन तयार होतं हे लोणचं कोणतं?
'स्पर्धा खुप कठीण होती. पाण्याचा वेग अचानक वाढत होता, कमी होत होता. पाण्यातील करंटसुद्धा विरुद्ध दिशेला वाहत होता. या सगळ्या संकटांचा सामना करून मला साडे 12 तासाच्या आत 81 किलोमीटरचा प्रवास पार करायचा होता. रोजच्या तयारीमुळे आणि सगळ्यांच्या विश्वासामुळे तुम्ही ही स्पर्धा पार करू शकालो,' असे जलतरणपटू आयुष तावडे याने सांगितले.
तर 'आम्ही दर आठवड्याला 12 ते 13 तास आयुष्य तयारी करुन घ्यायचो. मुळातच त्याला आवड असल्यामुळे आम्हाला फार मेहनत घ्यावी लागली नाही. 12 तास पाण्यातून बाहेर न येता, सलग पोहणे ही गोष्ट सोपी नाही. पण आयुषच्या जिद्दीमुळे तो ही स्पर्धा जिंकू शकला,' असे आयुषचे प्रशिक्षक कैलाश यांनी सांगितले. पुढेही भविष्यात आयुषला यातच करिअर करायचे असल्याचे त्याने सांगितले. त्याच्या या विक्रमामुळे सगळ्यांकडून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.