उंची तब्बल 8 फूट, संपूर्ण मूर्तीही कागदाच्या लगद्याची, घाटकोपरमधील भटवाडीचा राजा अन् देखाव्याची सर्वत्र चर्चा, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
मुंबई महानगरपालिकेने आवाहन केल्याप्रमाणे या मंडळाने इको फ्रेंडली असलेली पर्यावरणपूरक 8 फूट मूर्ती स्थापन केली आहे. यावर्षी अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या बाप्पाच्या देखाव्याची संकल्पना 'व्यसनाच्या विळख्यातून व्यसनमुक्ती कडे नेणारा महामानव' अशी ठेवण्यात आलेली आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : हल्ली अनेक गणेशोत्सव मंडळ गणपती उत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यावर भर देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे घाटकोपरमधील अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ आहे. यंदाचा भटवाडीच्या राजाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, हा बाप्पा संपूर्णपणे कागदाच्या लगद्यापासून बनवला गेला आहे आणि याची उंची तब्बल 8 फूट आहे.
अनोखा देखावा -
मंडळातील कार्यकर्ते या गणपती बाप्पाचे डेकोरेशन सुद्धा पर्यावरण पूरक पद्धतीने करण्यावर भर देतात. ही मूर्ती ठाणे यांनी बनवली आहे. मुंबई महानगरपालिकेने आवाहन केल्याप्रमाणे या मंडळाने इको फ्रेंडली असलेली पर्यावरणपूरक 8 फूट मूर्ती स्थापन केली आहे. यावर्षी अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या बाप्पाच्या देखाव्याची संकल्पना 'व्यसनाच्या विळख्यातून व्यसनमुक्ती कडे नेणारा महामानव' अशी ठेवण्यात आलेली आहे.
advertisement
मंडळाचे सरचिटणीस काय म्हणाले -
'आम्ही पूर्वीपासूनच गणपती उत्सवात देखावा सादर करताना तो पर्यावरणपूरक पद्धतीनेच करायचो. यंदा ठरवलं की, आपण मूर्तीसुद्धा कागदाच्या लगद्याचीच बनवूया. त्यामुळे यंदा आम्ही 60 ते 70 किलो कागदाच्या लगद्याचा वापर करून आमच्या मंडळाच्या गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे. आमच्याकडे पाहून घाटकोपरमधील इतरही अनेक मंडळांनी प्रेरणा घेतली आहे. ही महामंडळातील कार्यकर्त्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे,' असे अखिल भटवाडी सार्वजनिक उत्सव मंडळाचे सरचिटणीस प्रकाश गोळे यांनी सांगितले.
advertisement
Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध, जाणून घ्या, पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व, VIDEO
तर 'आमचा यंदाचा भटवाडीचा राजा याचे विसर्जनसुद्धा आम्ही तलावात करणार आहोत. यामुळे कोणालाही ट्राफिक असो किंवा मूर्तीची हानी असो काही होणार नाही. आमची बाप्पाची मूर्ती फक्त दोन तासाच्या आत विरघळेल हे आमच्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे,' असे मंडळाचे उपाध्यक्ष विजय वरपे यांनी सांगितले.
advertisement
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 06, 2024 10:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
उंची तब्बल 8 फूट, संपूर्ण मूर्तीही कागदाच्या लगद्याची, घाटकोपरमधील भटवाडीचा राजा अन् देखाव्याची सर्वत्र चर्चा, VIDEO