तब्बल 68 वर्षांची परंपरा, पुण्यातील चंद्रविलास उपहार गृहात मिळते तिखट मिसळ, खवय्यांची होते मोठी गर्दी, VIDEO

Last Updated:

पुण्यातील कुमठेकर रोड सदाशिव पेठ या ठिकाणी असलेलं चंद्रविलास उपहार गृह आहे. हे जवळपास 68  वर्ष जुनं असून इथे तिखट मिसळ मिळते. अनेक लोकांची ती आवडती मिसळ आहे.

+
तिखट

तिखट मिसळ पुणे

प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात अनेक जुने खाद्य पदार्थगृहे आहेत आणि पुणे शहराची ओळख जपणारी उपहार गृहेही आपण पाहिली असतील. त्याचप्रमाणे पुण्यातील कुमठेकर रोड सदाशिव पेठ या ठिकाणी असलेले चंद्रविलास उपहार गृह आहे. जवळपास 68 वर्ष जुन्या या उपहारगृहात तिखट मिसळ मिळते. अनेक लोकांची ही मिसळ आवडती बनली आहे. ही मिसळ नेमकी कशी बनवली जाते, याचविषयी आपण जाणून घेऊयात.
advertisement
इथे तुम्हाला मिसळ पाव हे 90 रुपयांना मिळतात तर वडा सॅम्पल, पालक भजीदेखील मिळतात. वडा सॅम्पल हा येथील प्रसिद्ध पदार्थ आहे. वर्षानुवर्षे अनेक लोक इथे फक्त मिसळ खाण्यासाठी येतात. तेव्हापासून ते आजपर्यंत तीच चव चाखायला मिळते. त्याचप्रमाणे शंकरपाळेही खायला मिळते.
advertisement
1956 साली आमच्या आजोबांनी या व्यवसायाला सुरुवात केली होती. आता ही तिसरी पिढी आहे, जी पुढे हा व्यवसाय चालवत आहे. मिसळसाठी लागणारे शेव, नायलॉन पोहे हे सगळं आम्ही स्वतः बनवतो. तसेच चांगल्या तेलामध्ये हे सगळं तयार करतो, त्यामुळे याला एक वेगळी चव आहे, असे येथील व्यावसायिक समीर झोरे सांगितले.
advertisement
12 वर्षांची परंपरा, तब्बल 12 गावं मिळून बसवला जातो एकच गणपती, जालन्यातील अनोख्या गणेशोत्सवाची महाराष्ट्रात चर्चा, VIDEO
तसेच इथे तयार होणारे सगळे पदार्थ हे शुद्ध तेलात बनवले जातात. तर मसाले हे ते स्वतः तयार करतात आणि हेच मसाले या मिसळसाठी वापरले जातात. त्यामुळे आजही तिच चव टिकून आहे. अगदी कमी किमतीमध्ये ही मिसळ तुम्हाला मिळते. सकाळी 7. 30 ते रात्री 7 पर्यंत हे सुरू असते, अशी माहिती व्यावसायिक समीर झोरे यांनी दिली.
मराठी बातम्या/पुणे/
तब्बल 68 वर्षांची परंपरा, पुण्यातील चंद्रविलास उपहार गृहात मिळते तिखट मिसळ, खवय्यांची होते मोठी गर्दी, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement