Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध, जाणून घ्या, पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व, VIDEO

Last Updated:

7 सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, बुधआदित्य योग, शषराज योग आणि नवपंचम योग हे 4 योग त्यादिवशी असल्याने संपूर्ण दिवसच आपल्यासाठी शुभ आहे. 

+
फाईल

फाईल फोटो

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : लाडक्या गणरायाच्या आगमनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात गणेश उत्सव साजरा केला जातो. गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख, महत्व आणि पूजेचा शुभ मुहूर्त याविषयीची माहिती जाणून घेऊयात.
पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिष वेदमूर्ती कुलदीप जोशी यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 7 सप्टेंबर रोजी लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, बुधआदित्य योग, शषराज योग आणि नवपंचम योग हे 4 योग त्यादिवशी असल्याने संपूर्ण दिवसच आपल्यासाठी शुभ आहे. मात्र, घरगुती गणपतीची प्राणप्रतिष्ठा ही दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी करून घ्यायची आहे. पहाटे 4 वाजून 50 मिनिटांपासून दुपारी 2 वाजून 12 मिनिटाचा कालावधी हा गणेश प्राणप्रतिष्ठेसाठी अत्यंत उत्तम आहे, अशी माहिती ज्योतिष वेदमूर्ती कुलदीप जोशी यांनी सांगितले.
advertisement
तसेच ज्यांच्याकडे व्रतानुसार गणपती बाप्पाचं आगमन होते. त्यांनी राहू काळाचा भाग सोडून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करावी. मात्र, ज्यांच्याकडे कायम उत्साहानुसार गणपती बाप्पा असतो त्यांनी मात्र राहू काळाचा फारसा विचार करू नये. यावेळी गौराईचे आगमनही अनुराधा नक्षत्रावर होणार आहे.
advertisement
12 वर्षांची परंपरा, तब्बल 12 गावं मिळून बसवला जातो एकच गणपती, जालन्यातील अनोख्या गणेशोत्सवाची महाराष्ट्रात चर्चा, VIDEO
10 सप्टेंबर 2024 रोजी गौराईचे आगमन होणार आहे. त्यादिवशीही रात्री 8 वाजून 24 मिनिटांनी गौराईंचं आगमन तुम्ही आपल्या घरी करू शकता. ज्येष्ठ नक्षत्रावर नेहमीप्रमाणे पूजन करून मूळ नक्षत्रावर गौरीचा विसर्जन रात्री 9:53 मिनिटांनी तुम्ही करू शकता. यावर्षीचे सर्व मुहूर्त जवळपास जास्त काळ असल्यामुळे कुठलाही प्रकारची मनात शंका न ठेवता यावर्षीचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात साजरा करू शकता, असेही कुलदीप जोशी यांनी सांगितले.
मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav 2024 : लाडक्या बाप्पाच्या आगमनाचे वेध, जाणून घ्या, पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement