आमने ग्रोथ सेंटरमध्ये 130 गावांचा नव्याने समावेश करण्यास राज्य सरकारने मान्यता दिलीये. त्यामुळे आता 176 गावांचा समावेश या ग्रोथ सेंटरमध्ये असणार आहे. या 483 चौरस किमी क्षेत्रासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. त्यामुळे या भागाचा लवकरच कायापालट होणार आहे.
130 गावांचा नव्याने समावेश
advertisement
सप्टेंबर 2024 मध्ये राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि भिवंडी या तालुक्यातील 46 गावांसाठी एमएसआरडीसीची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती केली होती. तेव्हा 109 चौरर किमी क्षेत्रासाठी ही नियुक्ती होती. आता यात अनगाव सापे विकास केंद्रातील 130 गावांच्या 374 चौ. किमी क्षेत्राचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता भिवंडीतील 148 गावे आणि कल्याणमधील 28 गावांसाठी एमएसआरडीसी नियोजन प्राधिकरण म्हणून काम करणार आहे. विशेष म्हणजे मुंबईतील नरिमन पॉइंट, बीकेसी, सीप्झसारखेच हे ग्रोथ सेंटर महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे.
कसे असेल ग्रोथ सेंटर?
आमने परिसरात 176 गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ग्रोथ सेंटरमध्ये इंडस्ट्रिअल पार्क, लॉजिस्टिक हब, टेक्सटाइल पार्क, फार्मा अँड बायटेक पार्क, स्पोर्ट्स अँड रिक्रीएशन हब, हेल्थकेअर क्लस्टर, फुड प्रोसेसिंग पार्क, इनोव्हेशन पार्क, मेडिसिटी, अॅग्रीकल्चर हब, होलसेल ट्रेड सेंटर यांचा समावेश असेल. तसेच रहिवासी आणि व्यावसायिक इमारती, थिम बेस पार्क देखील असेल. विशेष म्हणजे या भागाचा ट्रान्सिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट पद्धतीने विकास साधला जाईल.