डोंबिवली पश्चिमेकडील दीनदयाळ मार्गालगत एव्हरेस्ट सोसायटी परसिरात एक धोकादायक इमारत आहे. ही इमारत तोडण्यासाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे डोंबिवली पूर्वेकडून पश्चिमेकडे कोपड पुलावरून येणाऱ्या वाहनांना डावीकडे वळत घेऊन जुन्या डोंबिवली मार्गाने स्वामी शाळेजवळून इच्छित ठिकाणी जावे लागेल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात दुपारनंतर बदलणार हवा, कोकणात पुन्हा यलो अलर्ट, शुक्रवारचा हवामान अंदाज
advertisement
एव्हरेस्ट सोसायटी परिसरातील धोकादायक इमारत तोडण्यासाठी 11 ते 18 ऑगस्ट या काळात सकाळी 9 ते संध्याकाळी 6 या वेळेत कोपर उड्डाणपूलाकडून येणाऱ्या वाहनांना हॉटेल रणजीत पॅलेसजवळ प्रवेश बंद राहील. या मार्गाने जाऊ इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, ही अधिसूचना पोलीस वाहन, अग्निशमन, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरिडोर तसेच ऑक्सिजन सिलेंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनांना बंधनकारक नसेल असेही वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे.