Mumbai Rain: मुंबई, ठाण्यात दुपारनंतर बदलणार हवा, कोकणात पुन्हा यलो अलर्ट, शुक्रवारचा हवामान अंदाज
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Mumbai Rain: कोकणात पुन्हा पावसाचा जोर वाढत आहे. आज जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला असून मुंबई, ठाण्यातील हवामान अंदाज जाणून घेऊ.
दोन आठवड्यांच्या उघडिपीनंतर पावसाने कोकण किनारपट्टीवर जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडतोय. यामुळे हवामान विभागाने सलग तीन दिवस या भागांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पालघर या शहरी भागांमध्ये देखील आज हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
advertisement
मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून, हलक्या सरींची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दिवसाचा उत्तरार्ध म्हणजे दुपारनंतर काही भागांत मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पडू शकतो. सध्याचे तापमान 30 अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता असून, किमान तापमान 27 अंश सेल्सियस इतके राहील. विशेष म्हणजे, आज नारळी पौर्णिमा असल्याने समुद्रकिनाऱ्यांवर नागरिकांची गर्दी अपेक्षित आहे. त्यामुळे हवामानाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
advertisement
advertisement
advertisement
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने सलग तीसऱ्या दिवशी यलो अलर्ट जारी केला आहे. आज काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेत पावसाचा जोर अधिक असू शकतो. विजांच्या कडकडाटासह सरी पडण्याची शक्यता असून, सागरी किनाऱ्यांजवळील भागात राहणाऱ्या नागरिकांनी विशेष सावधगिरी बाळगावी.











