advertisement

तुमची EV ही 'हे' संकेत देतेय का? आग लागण्याचा आहे इशारा, करु नका इग्नोर

Last Updated:

How to keep EV Safe: नुकतीच इलेक्ट्रिक गाड्यामध्ये आग लागण्याचे वृत्त आले आहे. या घटनांवरुन स्पष्ट होते की, इलेक्ट्रिक गाड्या वापरताना सावधगिरी वापरणे खुप गरजेचे असते. तुम्हीही इलेक्ट्रिक गाडी चालवत असाल तर स्वतःच्या आपल्या कुटुंबाच्या सेफ्टीसाठी काही गोष्टींकडे अवश्य लक्ष ठेवा.

ईव्ही सेफ्टी
ईव्ही सेफ्टी
Mahindra BE6 Fire: नुकत्याच एका इलेक्ट्रिक कारमध्ये आग लागण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामुळे इलेक्ट्रिक कार मालकांची चिंता वाढली आहे. त्या कारच्या कंपनीने तपास केला आणि आग लागण्याचे कारणही सांगितले. तपासात समोर आले की, कारच्या मागड्या एका टायरमध्ये अजिबात हवा नव्हती तरीही ती 60 किमी/प्रति तासाच्या वेगाने जवळपास 10 मिनिटे चालवण्यात आली. कारच्या सिस्टमने वारंवार प्रेशर अलर्ट दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तुम्हालाही तुमची कार आग लागण्यापासून वाचवायची असेल तर काही गोष्टींकडे लक्ष ठेवा.
बॅटरीची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक
कंपनीच्या नियुक्त केलेल्या सेवा केंद्रात नेहमी तुमच्या बॅटरीची तपासणी करा. तेथील एक्सपर्ट बॅटरी फुलगी आहे का?  काही लीक तर नाही किंवा गरजेपेक्षा जास्त गरम तर होत नाहीये ना याकडे लक्ष ठेवतात. बॅटरी कधीही जास्त चार्ज करू नका आणि 100% चार्ज झाल्यानंतर ती अनप्लग करा. तुमच्या वाहनाची BMS (बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम) नेहमी अपडेट ठेवा.
advertisement
नेहमी ओरिजनल चार्जर वापरा
कंपनीने दिलेल्या चार्जर आणि केबलनेच तुमचे वाहन नेहमी चार्ज करा. बाजारात उपलब्ध असलेल्या बनावट किंवा स्वस्त चार्जरमध्ये पॉवर कंट्रोल नसतो आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते. तुमचे वाहन हवेशीर क्षेत्रात चार्ज करा, कारण खूप गरम ठिकाणी चार्ज केल्याने बॅटरी जास्त गरम होऊ शकते. एक्सटेंशन कॉर्ड वापरल्याने वायर जळू शकते किंवा स्पार्क होऊ शकतो.
advertisement
तुमची ईव्ही योग्य ठिकाणी पार्क करा
तुमचे वाहन सावलीत पार्क करण्याचा प्रयत्न करा, कारण जास्त उष्णतेमुळे बॅटरीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो आणि तिचे नुकसान होऊ शकते. बॅटरी थंड ठेवण्यासाठी तुमचे ईव्ही चांगल्या हवेशीर जागेत पार्क करा. तुमचे वाहन सुका कचरा, पेट्रोल किंवा रसायनांपासून दूर पार्क करा, कारण ते सहजपणे आग लावू शकतात.
advertisement
गाडीच्या सॉफ्टवेयरला नेहमी अपडेट ठेवा
EV तयार करणाऱ्या कंपन्या टाइम-टू-टाइम अपडेट पाठवतात. ज्या बॅटरीला थंड ठेवणे आणि चार्जिंगला सेफ ठेवण्यासाठी असतात. सॉफ्टवेयर अपडेटच्या माध्यमातून कंपनी गाडीच्या छोट्या-मोठ्या कमतरता नीट करते. ज्यामुळे अचानक आग लागणे किंवा वीजेच्या प्रॉब्लमचा धोका कमी होतो. नवीन अपडेट येताच इंस्टॉल करा. त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरु शकते.
advertisement
वॉर्निंग सिग्नलकडे दुर्लक्ष करू नका
तुम्हाला जळण्याचा वास येत असेल किंवा तुमच्या वाहनातून हलका धूर येत असेल तर सावध रहा. तुमच्या वाहनाच्या स्क्रीनवर इशारा चमकत असेल किंवा बॅटरी वेगाने डिस्चार्ज होत असेल, तर हे धोक्याचे लक्षण असू शकते. जर तुमचे वाहन गाडी चालवताना धक्का बसला किंवा जास्त गरम झाले तर ताबडतोब थांबा. अशा परिस्थितीत, वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करा, ते चार्जिंगपासून डिस्कनेक्ट करा आणि ताबडतोब मेकॅनिक किंवा सर्व्हिस कंपनीला कॉल करा.
view comments
मराठी बातम्या/ऑटो/
तुमची EV ही 'हे' संकेत देतेय का? आग लागण्याचा आहे इशारा, करु नका इग्नोर
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement