बिग बॉस फेम अभिनेत्याला अटक, रस्त्यावर धिंगाणा, दारूच्या नशेत गाड्यांचा चुराडा
- Published by:Minal Gurav
Last Updated:
बिग बॉस फेम प्रसिद्ध अभिनेत्यानं मोठा कांड केला आहे. अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. नेमकं झालंय काय?
मनोरंज विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अभिनेत्याला मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना पोलिसांनी पकडलं असून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. नेमकं काय घडलं पाहूयात.
कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये ही घटना घडली. कन्नड चित्रपट उद्योगातील (चंदन) प्रसिद्ध अभिनेता मयूर पटेलविरुद्ध पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवणे आणि बेपर्वा गाडी चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओल्ड एअरपोर्ट रोडवर झालेल्या एका भीषण अपघातानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
पोलिसांच्या माहितीनुसार, ओल्ड एअरपोर्ट रोडवर मयूर पटेल त्याची फॉर्च्युनर कार अत्यंत वेगाने चालवत होता. नियंत्रण सुटलं आणि त्याची कार पार्क केलेल्या कारला धडकली. धडक इतकी जोरदार होती की मागच्या इतर गाड्यांनाही धक्का बसला. जवळील इतर वाहने एकमेकांवर आदळली. अपघातात एकूण चार वाहनांचे मोठे नुकसान झालं. सुदैवाने या मोठ्या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही परंतु सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेचं मोठं नुकसान झालं आहे.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अभिनेता मयूर पटेलला ताब्यात घेतले. ब्रेथअॅलायझर चाचणी घेण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. अभिनेता दारूच्या नशेत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत अभिनेत्याची आलिशान फॉर्च्युनर कार जप्त केली. तसंच त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या घटनेची सखोल चौकशी केली जात आहे आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement
Actor Mayur Patel Drunk And Drive Case | ಅಜಾಗರೂಕತೆಯಿಂದ ಕಾರು ಚಲಾಯಿಸಿ ಸರಣಿ ಅಪಘಾತ | Bengaluru
.
.
.
.#MayurPatel #SandalwoodNews #DrunkAndDrive #BengaluruPolice #KannadaActor #CelebrityNews #bengaluru #Halsuru #police #Halsurupolice pic.twitter.com/alGOUlwH7L
— Sanjevani News (@sanjevaniNews) January 29, 2026
advertisement
अभिनेता मयूर पटेलबद्दल सांगायचं झाल्यास तो एका प्रतिष्ठित चित्रपट कुटुंबातील आहे. तो दिग्गज अभिनेता आणि संगीत दिग्दर्शक मदन पटेल यांचा मुलगा आहे. मयूरने 2000मध्ये कन्नड चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 'गुन्ना' आणि 'स्लम' सारख्या चित्रपटांमधून त्याने स्वत:ची ओळख निर्माण केली. तो "बिग बॉस कन्नड" मध्येही दिसला होता. या रिअॅलिटी शोने तो घराघरात पोहोचला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 29, 2026 7:37 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
बिग बॉस फेम अभिनेत्याला अटक, रस्त्यावर धिंगाणा, दारूच्या नशेत गाड्यांचा चुराडा










