advertisement

Private Jet : प्रायव्हेट जेटमध्ये गेल्यावर हे 5 नियम पाळावेच लागतात; आकाशातील या 'उडत्या महाला'त काय चालतं आणि काय नाही? वाचा

Last Updated:

प्रायव्हेट जेटचा प्रवास हा वेळेची बचत करण्यासाठी असला, तरी तो एका विशिष्ट 'एथिकेट्स' (शिष्टाचार) आणि नियमांनी चालतो. जर तुम्ही भविष्यात अशा विमानातून प्रवास करणार असाल, तर हे नियम माहीत असणं गरजेचं आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : विमानतळावर जेव्हा आपण सामान्य प्रवाशांप्रमाणे रांगेत उभे राहतो, तेव्हा बाजूच्याच एका गेटवरून एखादा सेलिब्रेटी किंवा उद्योगपती थेट आपल्या 'प्रायव्हेट जेट'कडे जाताना दिसतो. आपल्याला वाटतं की, इतके कोटी रुपये खर्च करून विमान भाड्याने घेतलंय किंवा विकत घेतलंय, तर तिथे काहीही करण्याची मुभा असेल. मनसोक्त मजा, हवं ते खाणं-पिणं आणि हवी तशी वागणूक... पण प्रत्यक्षात असं नसतं.
कोट्यवधींची किंमत असलेल्या या प्रायवेट विमानाचे काही असे अजब आणि शिस्तीचे नियम आहेत, जे तिथे बसलेल्या अतिश्रीमंत व्यक्तीलाही पाळावेच लागतात. प्रायव्हेट जेटमध्ये नक्की काय चालतं आणि काय नाही, याचे 5 महत्त्वाचे नियम आज आपण जाणून घेऊया.
प्रायव्हेट जेटचा प्रवास हा वेळेची बचत करण्यासाठी असला, तरी तो एका विशिष्ट 'एथिकेट्स' (शिष्टाचार) आणि नियमांनी चालतो. जर तुम्ही भविष्यात अशा विमानातून प्रवास करणार असाल, तर हे नियम माहीत असणं गरजेचं आहे.
advertisement
1. कॅप्टनची परवानगीच 'सर्वोच्च'
प्रायव्हेट जेटमध्ये तुम्ही विमानाचे मालक असाल किंवा लाखो रुपये देऊन ते भाड्याने घेतलं असेल, तरीही विमानाच्या आत 'कॅप्टन' (पायलट) हाच बॉस असतो. विमानात कोणतं साहित्य न्यायचं, किती वजन असावं आणि सुरक्षा नियम काय असावेत, याचा अंतिम निर्णय कॅप्टनचा असतो. जर पायलटला वाटलं की एखादी गोष्ट सुरक्षेसाठी घातक आहे, तर तो मालकालाही रोखू शकतो.
advertisement
2. मद्यपानाचे कडक नियम (Alcohol Policy)
अनेकांना वाटतं की प्रायव्हेट जेटमध्ये स्वतःच्या घरची महागडी दारू नेऊन पिता येते. पण नियम सांगतो की, तुम्ही स्वतः आणलेली दारू विमानात उघडू शकत नाही. सुरक्षिततेच्या कारणास्तव, केवळ विमानातील 'फ्लाइट अटेंडंट' ने सर्व्ह केलेलीच पेये तुम्हाला घेता येतात. तसेच, प्रवाशाला अती मद्यपान केल्यामुळे काही त्रास झाला, तर पायलट विमान लँड करण्याचा निर्णय घेऊ शकतो, ज्याचा मोठा दंड प्रवाशाला भरावा लागतो.
advertisement
3. लाल वाईन (Red Wine) आणि काही फळांवर बंदी
तुम्ही ऐकून थक्क व्हाल, पण अनेक प्रायव्हेट जेटमध्ये 'रेड वाईन' पिण्यास मनाई असते. याचं कारण असं की, प्रायव्हेट जेटमधील सोफे आणि कार्पेट हे अत्यंत महागड्या पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या लेदरचे बनलेले असतात. चुकून रेड वाईन सांडली, तर डाग निघत नाही आणि त्याचं नुकसान भरपाईचं बिल लाखो रुपयांत येऊ शकतं. काही विमानात 'बेरी' (Berries) सारखी फळं खाण्यावरही बंदी असते.
advertisement
4. सामानाचं वजन आणि बॅलन्सिंग
प्रायव्हेट जेट हे आकाराने लहान असतात. त्यामुळे तिथे सामान्य विमानांसारखं 'चेक-इन बॅगेज'चं मोठं स्टोरेज नसतं. विमानाचं वजन (Weight and Balance) संतुलित राहणं खूप महत्त्वाचं असतं. जर तुम्ही ठरवलेल्या वजनापेक्षा जास्त सामान नेलं, तर पायलट सुरक्षेसाठी तुमचं सामान खाली ठेवण्याचा आदेश देऊ शकतो. लक्झरी म्हणजे 'अमर्याद सामान' असं इथे चालत नाही.
advertisement
5. वेळ पाळणं अनिवार्य
प्रायव्हेट जेटमध्ये तुमच्या वेळेनुसार विमान उडतं, हे खरं असलं तरी विमानतळाचे 'स्लॉट्स' हे ठरलेले असतात. जर तुम्ही दिलेल्या वेळेपेक्षा खूप उशीर केला, तर विमानतळ प्रशासन तुमचं उड्डाण रद्द करू शकतं किंवा तुम्हाला तासनतास वाट पाहावी लागू शकते. शिवाय, विमानातील क्रू मेंबर्सचे 'ड्युटी अवर्स' संपले, तर विमान उडू शकत नाही.
advertisement
'शूज' संदर्भातला नियम देखील आहे, अनेक आलिशान प्रायव्हेट जेटमध्ये जाताना तुम्हाला तुमचे महागडे शूज काढून 'स्लिपर्स' घालाव्या लागतात. विमानातील महागडं कार्पेट खराब होऊ नये, हाच त्यामागचा उद्देश असतो.
प्रायव्हेट जेटचा प्रवास जितका आरामदायी आहे, तितकाच तो जबाबदारीचाही आहे. लक्झरीच्या जगात 'शिस्त' हा सर्वात मोठा दागिना असतो, हेच या नियमांवरून दिसून येतं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Private Jet : प्रायव्हेट जेटमध्ये गेल्यावर हे 5 नियम पाळावेच लागतात; आकाशातील या 'उडत्या महाला'त काय चालतं आणि काय नाही? वाचा
Next Article
advertisement
Gold Price : ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पांढरे
ऐन लग्नसराईत खिशावरचा भार वाढला, सोन्यानं बजेट बिघडवलं, दर ऐकाल तर डोळे होतील पा
  • लग्नासाठी किंवा गुंतवणुकीसाठी सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत

  • जागतिक बाजारातील घडामोडी आणि लग्नसराईमुळे वाढलेली मागणी यामुळे सोन्याच्या दराने

  • सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

View All
advertisement