ठाणे - सकाळी नाश्त्यासाठी झटपट होणारा आणि सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे उपमा आहे. उपमा बनवताना त्याचा अंदाज परफेक्ट असावा लागतो. जर पाण्याचा आणि रव्याचा अंतर चुकला तर उपमा पिठासारखा होतो. असा पिठाच्या गोळ्यासारखा उपमा होऊ नये म्हणून काय करावे आणि लुसलुशीत उपमा कसा बनवावा, याचीच रेसिपी आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
साहित्य - अर्धा वाटी रवा, एक टोमॅटो बारीक चिरलेला, एक कांदा बारीक चिरलेला, दोन ते तीन मिरच्या, अर्धी वाटी मूग, थोडी साखर आणि चवीपुरतं मीठ.
कृती - सर्वप्रथम कढईमध्ये रवा टाकून तुपात थोडे परतून घ्यावे. लालसर रंग येईपर्यंत रवा भाजला की तो बाजूला काढून घ्यावा. त्यानंतर पुन्हा कढईत दोन चमचे तेलात कांदा टाकावा. कांदा परतल्यानंतर त्यात मिरची, मुगडाळ आणि टोमॅटो टाकून पुन्हा पाच मिनिटे परतवावी. त्यानंतर कढईमध्ये थोडी चिमूटभर साखर आणि मीठ घालून घ्यावे. ते व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात भाजलेला रवा घालावा.
रक्तातली साखरेची पातळी चुकूनही वाढणार नाही, फक्त दररोज चघळा ही हिरवी पाने, VIDEO
यानंतर आता हळूहळू कढईत गरम पाणी टाकावे. गरम पाण्यामुळे रवा लुसलुशीत होण्यास मदत होते. जर गरम पाण्याऐवजी तुम्ही थंड पाणी टाकले तर रवा पीठासारखा होतो. गरम पाण्याने रवा व्यवस्थित शिजला की त्यावर थोडा वेळ झाकण ठेवावे. अशा पद्धतीने लुसलुशीत आणि झटपट उपमा तयार होईल. तर तुम्हालाही चविष्ट असा उपमा खायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तयार करू शकता.