ठाणे : काहीच दिवसात गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. या सणाच्या दिवशी मुलांना सुंदर कुर्ती खरेदी करायच्या असतील तर घाटकोपरमधील द वेडिंग कंपनी हे बेस्ट ऑप्शन आहे. इथे लास्ट साईजपर्यंत मुलांना आवडतील आणि सूट होतील असे सगळे कुर्ते फक्त 299 पासून मिळतात. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
द वेडिंग कंपनी ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी गेल्या अनेक वर्ष घाटकोपरमध्ये चांगल्या भावात मिळणाऱ्या कुर्त्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथे सगळे कुर्ते हे होलसेल भावात मिळतात. या कुर्त्यांचा कपडासुद्धा चांगल्या दर्जाचा असल्यामुळे घाटकोपरमध्ये हे खूप प्रसिद्ध आहेत.
advertisement
द वेडिंग कंपनी हे दुकान घाटकोपरमधील पंतनगर येथे आहे. इथे सिंपल कुर्त्यापासून ते प्रिंटेड कुर्त्यापर्यंत सगळे प्रकारचे कुर्ते उपलब्ध आहेत. इथे मिळणारा प्रीमियर प्रिंटेड कुर्ता पूर्ण कॉटन कपड्यात मिळतो, ज्याची किंमत 999 पासून सुरू होते. इथे 299 मध्ये मिळणाऱ्या कुर्त्यांमध्ये लाल, हिरवा, निळा, पिवळा, केशरी अशा सगळ्या रंगाचे कुर्ते उपलब्ध आहेत.
Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात बनवा खास डेकोरेशन, भन्नाट कल्पनेचा VIDEO
'आमच्याकडे अनेक गणपती मंडळ कुर्ते घेण्यासाठी येतात. जो रंग हवा असेल त्या रंगाचे कुर्ते आमच्याकडे उबलब्ध आहेत. आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी असल्यामुळे मंडळांमध्ये जसे एक सारखे, एक रंगाचे कुर्ती हवे असतात ते सुद्धा आमच्याकडे तयार करून मिळतात,' असे द वेडिंग कंपनीचे कुर्ता विक्रेते धवल भायाणी यांनी सांगितले.
तर मग तुम्हालाही चिकनकारी, सिम्पल, प्रिंटेड, प्रीमियम कुर्ता खरेदी करायचे असतील. तेही अगदी होलसेल भावात तर घाटकोपरमध्ये असलेल्या द वेडिंग कंपनी दुकानाला भेट देऊ शकता आणि यंदाच्या गणेशोत्सवात तुमचा लूक ट्रेडिंग करू शकता.