Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवात बनवा खास डेकोरेशन, भन्नाट कल्पनेचा VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
जर यंदा तुम्हालाही काही आगळेवेगळे आणि हटके डेकोरेशन करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. डेकोरेशनसाठीच्या भन्नाट कल्पना आपण जाणून घेऊयात.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त अनेकांना डेकोरेशन करायला आवडते. त्यामुळे विविध प्रकारचे डेकोरेशन पाहायला मिळते. जर यंदा तुम्हालाही काही आगळेवेगळे आणि हटके डेकोरेशन करायचे असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. डेकोरेशनसाठीच्या भन्नाट कल्पना आपण जाणून घेऊयात.
सर्वात आधी तुम्हाला टिश्यु पेपर, वर्तमानपत्र, गोणी, फेविकॉल, ग्लू, काळा आणि करडा रंग घ्यावा. सर्वात आधी तुम्ही वर्तमानपत्राच्या सहाय्याने कागदाचे गोळे बनवा. हे गोळे बनवून झाल्यानंतर गोळ्यांना पुर्ण टिश्यु पेपरने कवर करा आणि टिश्यू पेपरचे दोन तीन थर लावून घ्या. टिश्यू पेपर लावून झाल्यावर तुम्ही तुमच्या भिंतवर किंवा पुठ्यावर हे सगळे गोळे सम आकारात चिटकवून घ्या.
advertisement
गोळे चिटकवून झाल्यावर त्याला काळा रंग द्या. सर्वा गोळ्यांना रंग लावल्यावर पुन्हा एकदा काळा रंग मारून घ्या आणि त्याच्यानंतर थोडासा हलका करडा रंग मारून घ्या. जेणेकरुन गुहेचा फिल येईल.
advertisement
आता पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे धबधबा निर्माण करायचा आहे. तर हा धबधबा निर्माण करण्यासाठी तुम्ही एक तागाची गोणी घ्या. ही गोणी तुम्हाला 2 दिवस उन्हात भिजत ठेवावी लागणार आहे. यामुळे ती चांगली वाळेल. गोणी भिजवण्याआधी ती तुम्हाला नेमकी कोणत्या आकाराची पाहिजे ते ठरवावा. यामुळे गोणी ओली असताना तुम्हाला आकार देता येईल.
advertisement
Chhatrapati Sambhajinagar : समृद्धी महामार्गाच्या बाजूच्या जमिनींचा भाव कोटीच्या घरात; जाणून घ्या, यामागचं नेमकं कारण, VIDEO
गोणी बनवण्याआधी एक लाकडी स्टॅन्ड बनवून घ्यावा आणि त्या स्टँडवर ठेवून गोणीला धबधब्याचा आकार द्यावा. मग एक मोटार कनेक्ट करुन पाईप आणि धबधबा लावून घ्यावा. सर्व मोटार कनेक्शन टेबलाच्या खाली लावून प्लग जोडून घ्यावे. अशाप्रकारे तुमचे सुंदर व भन्नाट डेकोरेशन तयार होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2024 4:47 PM IST