Ganeshotsav Pune : पुण्यात सुरू झालं 'देशातील पहिलं तृतीयपंथीयांचं ढोलपथक-शिखंडी', नेमकी कशी सुचली ही संकल्पना, VIDEO

Last Updated:

पुण्यात एक ढोलपथक सुरू झाले आहे. या पथकाचं नाव आहे 'शिखंडी ढोल-ताशा पथक' असे आहे. हे ढोलताशा पथक हे भारतातील पहिले तृतीयपंथीयांचे ढोल ताशा पथक आहे.

+
गणेशोत्सव

गणेशोत्सव पुणे

शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : सध्या गणेशोत्सवाचे वेध लागले आहेत. सर्वजण आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनाची वाट पाहत आहेत. गणेशोत्सवात तुम्हाला ढोल-ताशा पथके पाहायला मिळतात. पुण्यातही अनेक ढोल-ताशा पथके आहेत. लहान मुलांपासून ते साठी तसेच त्यापलीकडच्या लोकांपर्यंत अनेकजण अगदी उत्साहाने यात सहभागी होत असतात. मात्र, आता तृतीयपंथीसुद्धा यामध्ये सहभागी होणार आहेत. पुण्यात एक ढोलपथक सुरू झाले आहे. या पथकाचं नाव आहे 'शिखंडी ढोल-ताशा पथक' असे आहे. हे ढोलताशा पथक हे भारतातील पहिले तृतीयपंथीयांचे ढोल ताशा पथक आहे.
advertisement
भारतातील पहिले तृतीयपंथीयांचे ढोल ताशा पथक -
यंदाच्या गणेशोत्सवात तृतीयपंथी हे ढोल ताशाचे वादन करताना पुणेकरांना पाहायला मिळणार आहे. या वादकांसमोर अनेक समस्या होत्या. ढोल-ताशा कसे जमवायचे, सराव कुठे करायचा, प्रशिक्षण कोण देणार, मात्र त्यावर मात करत 'शिखंडी' ढोल- ताशा पथकाने वादनाची तयारी सुरू केली. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच मार्केट यार्ड परिसरात त्यांनी जिद्दीने आणि जोमाने सराव सुरू झाला, अशी माहिती या पथकाच्या मनस्वी गोईलकर यांनी दिली.
advertisement
नादब्रह्म ढोल-ताशा पथकाचे अतुल बेहरे यांनी तृतीयपंथी वादकांना प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली. मनस्वी यांच्या गुरू कादंबरी शेख यांनी दीपक मानकर यांना ही संकल्पना सांगितली. त्यांनी मदतीचा हात पुढे केला."एकूण 25 वादक या पथकात वादन करणार आहेत. रोज सायंकाळी 7 ते 8 या वेळेत या ठिकाणी वादनाची पूर्व तयारी केली जात आहे. येणाऱ्या गणेशोत्सवात शिखंडी ढोलताशा पथक वादनासाठी सज्ज झाले आहे," असेही त्यांनी सांगितले.
advertisement
Ganeshotsav 2024 : अजूनही अनेकांकडे बसतो अडीच किंवा तीन दिवसांचा बाप्पा, यामागचं कारण काय?
'शिखंडी' हे पथक सुरू करताना अनेक अडचणी आल्या. मात्रस इच्छाशक्ती आणि ठाम विश्वासाच्या जोरावर मार्ग काढत हे पथक सुरू केले. यंदा मानाच्या पाच गणपतींसह दगडूशेठ गणपती समोर आम्ही वादन करणार आहोत. यातून तृतीयपंथी व्यक्तीही सक्षमपणे आपल्या बरोबरीने उभे राहू शकतात, हा संदेश आम्हाला याद्वारे द्यायचा आहे, असे त्यांनी म्हटले.
मराठी बातम्या/पुणे/
Ganeshotsav Pune : पुण्यात सुरू झालं 'देशातील पहिलं तृतीयपंथीयांचं ढोलपथक-शिखंडी', नेमकी कशी सुचली ही संकल्पना, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement