Ganeshotsav 2024 : अजूनही अनेकांकडे बसतो अडीच किंवा तीन दिवसांचा बाप्पा, यामागचं कारण काय?

Last Updated:

गणेश उत्सवात अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. यामध्ये परंपरेनुसार बाप्पा किती दिवस ठेवायचा, हे ठरवलं जातं.

+
गणेशोत्सव

गणेशोत्सव 2024

साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : लवकरच गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे. गणेश उत्सवात पाच दिवसांचा गणपती, दीड दिवसांचा गणपती, गौरी गणपती सोबत किंवा 10 दिवसांचा गणपती बाप्पा बसवला जातो, हे आपल्या सर्वांना माहिती आहे. मात्र, अनेक जण अडीच किंवा तीन दिवसांचा गणपती बाप्पाही बसवतात. यामागे नेमके काय कारण आहे, हे अनेकांना माहिती नसेल. त्यामुळे हेच आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
गणेश उत्सवात अनेकांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होतात. यामध्ये परंपरेनुसार बाप्पा किती दिवस ठेवायचा, हे ठरवलं जातं. जे चाकरमानी मुंबईतून गावी गणपतीसाठी येतात किंवा ज्यांना कामामुळे वेळ अधिक मिळत नाही, असे सगळे लोकं दीड दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात. याबाबत गुरुजी तुषार जोशी यांनी माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 'कोकणात काही लोकांकडे अडीच किंवा 3 दिवसांचा बाप्पा बसवला जातो, परंतु यामागे कोणतेही शास्त्रीय कारण नाही. ज्यांना 5 दिवसांचा बाप्पा काही कारणास्तव बसवता येत नाही, मग त्यात आर्थिक कारणसुद्धा असू शकते, असे काही लोकं अडीच किंवा तीन दिवसांचा गणपती बाप्पा बसवतात. पूर्वजांनी कधीतरी ही परंपरा सुरू केली असल्याने काहींकडे अजुनही बाप्पाचे अडीच किंवा तीन दिवसांनंतर विसर्जन केले जातो,' असे गुरुजी तुषार जोशी यांनी सांगितले.
advertisement
‘आप्पाचा विषय लय हार्ड’, रॅप सोशल मीडियावर तुफान गाजतय रॅप साँग, कोण आहे हा तरुण?
तसेच, कुळाचार पद्धती किंवा परंपरा यामुळेच अनेकांकडे अजुनही गणपती 3 दिवसांचा असतो. याला कोणतेही शास्त्रीय कारण नसल्याचे गुरुजींनी सांगितले. दरम्यान, सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचे वेध लागले आहे. सर्व जण आपल्या लाडक्या गणरायाची आतुरतेने वाट पाहत आहे. बाजारातही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. खरेदीसाठी लोकांची मोठी गर्दी होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
Ganeshotsav 2024 : अजूनही अनेकांकडे बसतो अडीच किंवा तीन दिवसांचा बाप्पा, यामागचं कारण काय?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement