'आप्पाचा विषय लय हार्ड', सोशल मीडियावर तुफान गाजतंय रॅप साँग, कोण आहे हा तरुण?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
सध्या सोशल मीडियावर 'आप्पाचा विषय लय हार्डय' हे रॅपसाँग खूप गाजत आहे. पुण्यातील ऋषी भोसले अर्थात वरदान या तरुणाने 24 वर्षीय हे रॅप लिहिले आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. त्यामुळे दरदिवशी कोणी काही ना काही रीलच्या माध्यमातून अपलोड करत असतो. यामध्ये काही गाणी ही थोड्या कालावधीतच अत्यंत लोकप्रिय होतात आणि ट्रेंडिंग गाण्यावर व्हिडिओ बनवताना दिसून येतात. मागील काही दिवसात ट्रेंडिंग असणारे गाणे म्हणजे 'आप्पाचा विषय लय हार्ड' हे अनेकांनी ऐकलंच असेल. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळेच रील बनवताना दिसून येत आहेत.
advertisement
सध्या सोशल मीडियावर 'आप्पाचा विषय लय हार्ड' हे रॅपसाँग खूप गाजत आहे. पुण्यातील ऋषी भोसले अर्थात वरदान या तरुणाने 24 वर्षीय हे रॅप लिहिले आहे. तो हडपसर या भागात राहायला आहे. हा रॅप त्याने स्वतःच्या अनुभवातून लिहिला आहे. त्यांनी हे रॅप साँग 5 ते 10 दिवसामध्ये लिहिले आहे.
advertisement
त्याचे हे दुसरे रॅप आहे. मात्र, याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आपण काही तरी गाणे बनवून टाकावे, याच उद्देशाने त्याने ते तयार केले होते. या मराठी रॅप साँगला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. लोकांना हे रॅप साँग खूप आवडले आहे. या गाण्याने या तरुणाला एक वेगळी ओळख दिली आहे. हे गाणे व्हायरल झाल्यामुळे घरच्यांना आणि मित्रांना आपल्यामुळे ओळखले जात आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
advertisement
चोरलेला मनी प्लांट लावणं शुभ की अशुभ?, अनेकांना माहिती नसेल, महत्त्वाची माहिती.., VIDEO
पुण्यात आप्पा हे नाव कॉमन नाव आहे. असे काही विचार करून लिहिले नाही. जसे सुचले तसे लिहिले आहे. तर रेकॉर्ड आणि लिहिण्यासाठी पूर्ण 1 ते दीड महिना कालावधी गेला आहे. येणाऱ्या पुढच्या काळात अजून वेगवेगळ्या प्रकारचे रॅप साँग बघायला मिळतील. लोकांचा याला खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्याने खूप छान वाटते आहे, या शब्दात ऋषी भोसले या तरुणाने लोकल18 शी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 04, 2024 1:15 PM IST