चोरलेला मनी प्लांट लावणं शुभ की अशुभ?, अनेकांना माहिती नसेल, महत्त्वाची माहिती.., VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही सुकू देऊ नये. खरंतर घरातील कोणतंही झाड कधी सुकू देऊ नये, कारण सुकलेले झाड हे दुर्भाग्य आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : वास्तुशास्त्रात घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये झाडे लावणे अत्यंत शुभ मानले जाते. झाडांमुळे आजूबाजूचा परिसर सुंदर आणि सकारात्मक होतो. अनेकजण घर किंवा ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे पसंत करतात. खरे तर वास्तु शास्त्रानुसार मनी प्लांट घरातील आर्थिक समस्या दूर व्हावी, या हेतूने लावले जाते. नावाप्रमाणेच मनी प्लांट हा पैसा देणारा प्लांट आहे, असे म्हणतात. मात्र, अनेकांच्या मते मनी प्लांट विकत न घेता चोरी करुन लावला जातो. पण चोरी केलेला मनी प्लांट घरात लावणं खरंच योग्य आहे का?, हेच आपण जाणून घेऊयात.
advertisement
मनी प्लांट चोरी करुन लावणं योग्य आहे का?
मनी प्लांट चोरी करून लावावा तरच फायदा होतो, असे अनेकांना म्हणताना तुम्ही पाहिले असेल. मात्र, चोरी करणे चांगली गोष्ट नाही. असे केल्याने देवी लक्ष्मी नाराज होतात. त्यामुळे मनी प्लांट चोरण्याची चूक कधीही करू नये. नाहीतर यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते.
मनी प्लांट विकत घ्यावे -
मनी प्लांट चोरणे चुकीचे आहे. तसेच मनी प्लांट कोणालाही दानही करू नये. यामुळे शुक्र ग्रह क्रोधित होतो, त्यामुळे तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरं जावे लागेल. मनी प्लांट नेहमी स्वतः खरेदी करावे आणि आपल्या घरात लावावे. तरच याचा पूर्ण फायदा आपल्याला होतो.
advertisement
मनी प्लांट लावण्याचे नियम -
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कधीही सुकू देऊ नये. खरंतर घरातील कोणतंही झाड कधी सुकू देऊ नये, कारण सुकलेले झाड हे दुर्भाग्य आणि नकारात्मकतेचे प्रतीक आहे. त्यामुळे मनी प्लांटला नियमित पाणी द्यावे.
advertisement
मनी प्लांट नेहमी घराच्या आतमध्ये ठेवा, याला जास्त उन्हाची गरज नसते, त्यामुळे ते नेहमी घरातच ठेवावे. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट घराच्या बाहेर ठेवणे अशुभ मानले जाते. बाहेरच्या हवामानात ते सहज सुकते आणि त्याची योग्य वाढ होत नाही. झाडाची वाढ खुंटणे अशुभ मानले जाते, अशी माहिती ज्योतिषी राजेश जोशी यांनी दिली आहे.
advertisement
सूचना - वर दिलेली माहिती ही ज्योतिष, पंडित यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 03, 2024 9:36 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
चोरलेला मनी प्लांट लावणं शुभ की अशुभ?, अनेकांना माहिती नसेल, महत्त्वाची माहिती.., VIDEO