Vegetables Rate in Pune : भेंडी 45, तर गवार 60 रुपये किलो, पुण्यात भाजीपाल्याचे दरात मोठी वाढ, सविस्तर यादी
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Khushalkant Dusane
Last Updated:
सध्या पुण्यात भाज्यांचे दर तेजीत असलेले पाहायला मिळत आहेत. पाऊस जास्त असल्याने आवक कमी झाली. तर परराज्यातून येणारा मालही कमी आहे. पुढील एक महिना हीच स्थिती राहिल.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : यंदा पाऊस जास्त झाल्याचा परिणाम शेतमाल आणि फळभाज्यांवर झाल्याचे पाहायला मिळत आहे. मार्केट यार्डमध्ये राज्यासह परराज्यांतून सुमारे 90 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने लसूण, भेंडी, गवार, काकडी, फ्लॉवर, कोबी, घेवड्याच्या भावात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. गेल्या 15 दिवसांत झालेल्या पावसामुळे पालेभाज्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. परिणामी सर्वच पालेभाज्यांचे भाव तेजीत आहेत. याचबाबतचा हा विशेष आढावा.
advertisement
सध्या पुण्यात भाज्यांचे दर तेजीत असलेले पाहायला मिळत आहेत. पाऊस जास्त असल्याने आवक कमी झाली. तर परराज्यातून येणारा मालही कमी आहे. पुढील एक महिना हीच स्थिती राहिल. त्यानंतर माल जास्त येऊन थोड्या फार प्रमाणात भाव कमी होतील. नगर, सोलापूर, सातारा या भागातून भाज्याची आवक ही जास्त होते. कोथिंबीर 50 ते 70, काकडी - 35, भेंडी - 45, फ्लॉवर - 55, वाटाणा - 110 ते 120, बीन्स - 90, गवार 50 ते 55, लसूण - 300 रुपये, मेथी - 30, कांदा - 40 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. 40% आवक कमी झाल्याने हे दर वाढले आहेत.
advertisement
भाज्यांचे दर - (प्रति 10 किलो)
advertisement
भेंडी: 300-450, गवार: 400-600, टोमॅटो : 100-150, दोडका: 300-500, हिरवी मिरची: 400-450, दुधी भोपळा: 150-250, चवळी: 200-250, काकडी: 200-300, कारली हिरवी: 300-350, पांढरी: 200-250, पापडी: 300-400, कोबी: 80-160, वांगी: 200-350.
फळांचे दर -
मोसंबी (3 डझन) : 90-250, (4 डझन) 30-100, संत्रा: (10 किलो) : 150-800, डाळिंब (प्रतिकिलो) भगवा: 70-250, आरक्ता : 30-80, गणेश: 20-50, कलिंगड : 10-15, खरबूज : 20-35, पपई : 15-35, चिक्कू (10 किलो): 100-500, पेरू (20 किलो): 400-500.
advertisement
पालेभज्यांचे शेकड्यातील किंमत :
कोथिंबीर: 3000-4000, मेथी: 1500-2500, शेपू: 1000-1500, कांदापात: 1500-2000, करडई: 5000-800, पुदिना: 5000-1500, राजगिरा: 500-800, चुका: 500-1000, चवळी: 500-800, पालक: 1000- 1800.
मार्केटयार्डामध्ये रविवारी राज्यासह परराज्यांतून सुमारे 10 ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश येथून हिरवी मिरची 10 टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथून 8 टेम्पो कोबी, आंध्रप्रदेश तमिळनाडूतून शेवगा पाच टेम्पो, इंदूर येथून 8 टेम्पो गाजर, कर्नाटक आणि गुजरात येथून घेवडा 6 टैल्गो, कर्नाटक, गुजरात येथून भुईमूग शेंग 4 टेम्पो, मध्यप्रदेशातून लसणाची 12 टेम्पो आवक झाली. तर स्थानिक परिसरातील भागातून इतर फळ भाज्याची आवक झाली आहे. त्यामुळे पुढील एक महिना फळे, भाज्यांच्या दरात तेजी असलेली पाहायला मिळणार आहे, अशी माहिती आडत व्यावसायिक पांडुरंग सुपेकर यांनी दिली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Sep 03, 2024 8:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Vegetables Rate in Pune : भेंडी 45, तर गवार 60 रुपये किलो, पुण्यात भाजीपाल्याचे दरात मोठी वाढ, सविस्तर यादी









