सणानिमित्त गोड पदार्थ खात असाल तर दातांना होईल त्रास, नेमकी काय काळजी घ्यावी?, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Nikita Tiwari
Last Updated:
दातांची काळजी कशी घ्यावी?, दातांवर होणारे परिणाम?, दातांची स्वच्छता कशी करावी?, या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. सुबोध प्रधान यांनी दिली.
निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : सगळीकडे सध्या सणाचे वातावरण सुरू आहे. सणानिमित्त गोड खाद्यपदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. मात्र, गोड खाद्यपदार्थ खाल्यानंतर दातांची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. दातांची योग्य काळजी घेतली नाही तर भविष्यात दाताला कीड लागून खराब होण्याची शक्यता असते. म्हणून दातांची स्वच्छता करणेही फार महत्त्वाचे असते. अशा परिस्थितीत दातांची काळजी कशी घ्यावी?, दातांवर होणारे परिणाम?, दातांची स्वच्छता कशी करावी?, या सर्व प्रश्नांची उत्तरे डॉ. सुबोध प्रधान यांनी दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्वप्रथम कोणताही गोड पदार्थ खाल्ल्यावर चूळ भरावी. कारण सतत गोड खाद्यपदार्थ खाणे होतच राहते, तर जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा खाल्ल्यानंतर चूळ भरावी. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन वेळेस ब्रश करावे. आपण दिवसाच्या सुरुवातीला ब्रश करतो, त्यानंतर 24 तासांच्या अंतरानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रश करतो.
advertisement
रात्री झोपण्यापूर्वी जर ब्रश केला नाही तर दिवसभर खालेल्या अन्नपदार्थांचे, गोड खाद्यपदार्थांचे कण आपल्या दातात अडकून राहतात आणि त्यामुळे कीड लागण्याची शक्यता निर्माण होते. ब्रश करताना सर्व दात यांच्यावर योग्य रीतीने ब्रश फिरवावा. दातांच्या आतल्या बाजूने तसेच वर खाली दोन्ही बाजूला योग्य रीतीने ब्रश फिरवावा.
advertisement
मुंबईत मिळणार हक्काचे घर, म्हाडाने अर्ज करण्याची मुदत वाढवली, आता ही आहे शेवटची तारीख
दातांची काळजी घेण्यासोबतच आहाराची काळजी घेणेही खूप महत्त्वाचे आहे. सतत गोड खाणे शरीरासाठी योग्य नाही आहे. त्यामुळे शाकाहारी जेवणासाठी पालेभाज्या, फळभाज्या, दूध, पनीर तसेच मांसाहारी जेवणात अंडी या सगळ्या गोष्टी दातांसाठी फायदेशीर ठरतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
advertisement
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. कोणताही वैयक्तिक सल्ला नाही. त्यामुळे कोणताही उपचार करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 03, 2024 5:06 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
सणानिमित्त गोड पदार्थ खात असाल तर दातांना होईल त्रास, नेमकी काय काळजी घ्यावी?, VIDEO