गणेशोत्सवात बाप्पासाठी बनवा भेसळमुक्त नैवेद्य, साताऱ्यातील orgatma शॉप आता ठाण्यातही सुरू, इथे काय काय मिळतं?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
ऑरगॅत्माच्या या सगळया गोष्टी देशातच नव्हे तर परदेशातही विकल्या जातात. यामध्ये शुध्द गायीचे तूप, मध, वेगवेगळे जात्यावर दळलेले पीठ, साबण आणि इतर वस्तु या सगळ्यांचा समावेश आहे.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : अनेकदा बाजारात मिळणारे तेल आणि इतर पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळे अनेकदा काळजी घेण्याचा इशारा दिला जातो. यातच आता ठाणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तेल आणि इतर पदार्थातील भेसळपासून वाचण्यासाठी मूळ साताऱ्यातील ऑरगॅत्मा ठाण्यातही सुरू झाले आहे. इथे तुम्हाला पारंपरिक पद्धतीने काढलेले घाण्याचे तेल, कोणताही रंग न वापरता बनवलेली हळद, वेगवेगळ्या डाळी मिळतील.
advertisement
यामुळे आता तुम्ही यंदाच्या गणेशोत्सवासाठी भेसळ विरहित नैवेद्य बनवू शकता. हे दुकान ठाण्यातील नौपाडा येथे आहे. ऑरगॅत्मा नेमकं काय आहे, ठाणेकरांना याचा कसा लाभ घेता येणार आहे, याचबाबत जाणून घेऊयात.
ऑरगॅत्मा या स्टोअरची 2017 साली साताऱ्यात सुरू झाली. पारंपारिक घाण्यातून तयार केलेले तेल, कोणतीही भेसळ न करता तयार केलेले हळद, तूप, मध या गोष्टी इथे उत्तम दर्जाच्या मिळतात. साताऱ्यातून आता थेट ठाण्यात ऑरगॅत्मा आले आहेत. त्यामुळे ठाणेकरांनाही आता भेसळ नसणारे पदार्थ खायला मिळणार आहेत.
advertisement
सणानिमित्त गोड पदार्थ खात असाल तर दातांना होईल त्रास, नेमकी काय काळजी घ्यावी?, VIDEO
ऑरगॅत्माच्या या सगळया गोष्टी देशातच नव्हे तर परदेशातही विकल्या जातात. यामध्ये शुध्द गायीचे तूप, मध, वेगवेगळे जात्यावर दळलेले पीठ, साबण आणि इतर वस्तु या सगळ्यांचा समावेश आहे.
Rain in Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, IMD कडून महत्त्वाचा इशारा..
advertisement
'ठाणेकरांना ऑरगॅत्माचे शुद्ध पदार्थ खाता यावेत, यासाठी आम्ही ठाण्यात याची ब्रांच सुरू केली. आमच्या इथे मिळणारे सगळे पदार्थ हे पारंपारिक पद्धतीने बनवलेले आहे. यामध्ये कोणतीही भेसळ केलेली नाही,' असे ऑरगॅत्मामधील कर्मचारी पूजा बगाटे यांनी सांगितले.
advertisement
यंदा ऑरगॅत्मा मध्ये तुम्हाला मोदक बनवण्याचे स्पेशल पीठ सुद्धा आलेले आहे. हे पीठ अत्यंत पौष्टिक आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी तुम्ही इथले सगळे पदार्थ वापरून बाप्पाला पौष्टिक नैवेद्य देऊ शकता.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 03, 2024 7:56 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
गणेशोत्सवात बाप्पासाठी बनवा भेसळमुक्त नैवेद्य, साताऱ्यातील orgatma शॉप आता ठाण्यातही सुरू, इथे काय काय मिळतं?