कल्याण-डोंबिवली परिसरातील प्रकल्प
कल्याण-डोंबिवली परिसरात म्हाडाचा नवीन प्रकल्प सुरू झाला आहे. येथे साधारण 1 BHK आणि 2 BHK घरे फक्त 15 लाखांपासून उपलब्ध आहेत. या प्रकल्पात आधुनिक राहणीमानासाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा आहेत शिवाय तात्काळ राहण्यासाठी तयार घरांमुळे खरेदीदारांना जास्त वेळ प्रतीक्षा करावी लागणार नाही.
स्टेशनजवळ अगदी जवळ असा हा प्रकल्प
advertisement
घर घेताना सर्वात महत्त्वाचा गोष्ट म्हणजे लोकेशन आणि कनेक्टिव्हिटी. कारण घरा जवळच्या सुविधा आणि प्रवास सोपा असल्यास जीवन जास्त आरामदायी होतं. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मुंबईत एक खास संधी आली आहे. रेल्वे स्टेशनजवळ फक्त 15 लाखात हे म्हाडाचे घर आहे. स्टेशनपासून जवळ असलेली ही घरे ऑफिस जाणाऱ्यांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि लहान कुटुंबांसाठी परफेक्ट आहेत. आसपास बाजारपेठा, शाळा, हॉस्पिटल आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. म्हणजे उत्तम सुविधा आणि परवडणारी किंमत दोन्ही मिळणार आहेत. अशा ठिकाणी घर मिळणं ही खरोखरच सुवर्णसंधी आहे.
लोकेशन
हा प्रकल्प कल्याण–डोंबिवली परिसरातील शिरढोण भागात आहे. हा परिसर सध्या मुंबईतील सर्वाधिक झपाट्याने विकसित होणाऱ्या भागांपैकी एक आहे. उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी, वाढती सोयीसुविधा आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरमुळे हा भाग आता घरखरेदीदारांचा नवा हॉटस्पॉट बनत आहे.