TRENDING:

अशी शाळा जिथं गरिब विद्यार्थ्यांना दिलं जातं मोफत शिक्षण, काय आहे ही नेमकी संकल्पना?, VIDEO

Last Updated:

जिजाऊ बालमंदिर या शाळेमध्ये आथिर्क दुर्बल घटकातील मुलांना मोफत शालेय शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये मुलांची अर्थिक परिस्तिथी बिकट असल्याने त्यांच्या उज्वल भवितव्याचा विचार करतां या गरजू बालकांसाठी १ ते १० वी पर्यंतच्या सर्व शिक्षणाचा मोफत प्रशिक्षण देण्यात येत आहे  त्यामुळे या शाळेतील  प्राचार्यांनी ही संकल्पना कशी आकस्मित आणली हे जाणून घेऊयात...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रियांका जगताप, प्रतिनिधी
advertisement

ठाणे - सध्याची परिस्थिती पाहिली तर सरकारी शाळांची अवस्था वाईट होत चालली आहे. तसेच खासगी शाळांच्या फीस या सर्वसामान्य नागरिकांना परवडत नसल्याची परिस्थिती आहे. या सर्व परिस्थितीत मात्र, एक शाळा अशी आहे, जिथे आथिर्क दुर्बल घटकातील मुलांना मोफत शालेय शिक्षण दिले जाते. याच शाळेबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.

advertisement

ठाण्यातील जिजाऊ बालमंदिर या शाळेमध्ये आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना मोफत शालेय शिक्षण दिले जाते. या शाळेमध्ये मुलांची अर्थिक परिस्तिथी बिकट असल्याने त्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा विचार करता या गरजू बालकांसाठी पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व शिक्षणाचा मोफत शिक्षण देण्यात येत आहे. या शाळेतील मुख्याध्यापिका ऋतुजा गवस यांनी ही संकल्पना कशी आणली याबाबत त्यांनी माहिती दिली.

advertisement

लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, 'ज्ञानाय दानायच रक्षणाय' हे ध्येयपर ब्रीदवाक्य घेऊन जिजाऊ बालमंदिर शाळा येथील शिक्षक, मुख्याध्यापक सेवाभाव म्हणून कार्यरत नेहमीच असतात. फक्त नोकरी असा विचार करत नाहीत. इथे येणारे विद्यार्थी आर्थिक दुर्बल घटकातील आहे. आपले पाल्य चांगले शिक्षण घेऊन मोठे व्हावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. मात्र, हातावर पोट असल्यामुळे आणि भूक ही मोठी विवंचना असल्यामुळे पालक अर्थाजनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे पाल्यांकडे हवे तसे लक्ष देता येत नाही.

advertisement

मुंबईतील ही 7 ठिकाणं कोणती, जिथं मिळतात सर्वात भारी वडापाव, photos

अशावेळी आपण सामाजिक देणे लागतो, या भावनेतून शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देतात आणि विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहातून दूर जाऊ नये यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील असतात. शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तके शासनाकडून मिळत असतात. तरीही इतर काही शैक्षणिक साहित्य शाळेला लागत असते. अशावेळी समाजातील हितचिंतक व संस्था यांच्या सहकार्यातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणले जाते.

advertisement

विद्यार्थ्यांसाठी शाळेकडून मोफत बस सेवा उपलब्ध करून दिलेली आहे. इतर सगळ्या सुविधा जसे की, सँडल, गणवेश असेल त्यांना उपलब्ध करुन दिले जाते. अधिकाधिक पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या वस्तीमध्ये जाऊन उपक्रम, सण साजरे केले जातात, त्यांच्या वैयक्तिक अडचणी समजून घेतल्या जातात आणि शाळा खऱ्या अर्थाने सामाजिक संस्था आहे हे रुजवले जाते.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

शिक्षक मनगटावर घड्याळ न बघता अधिकाधिक वेळ शाळेसाठी देतात. वस्तीत जाऊन विद्यार्थ्यांना आणणे त्यांचा शिक्षण प्रवाहासाठी अधिकाधिक प्रयत्नशील असतात. शाळेत माजी विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग आहे. समाजाचे चांगले सहकार्य आहे. शाळेतून बाहेर पडणारे विद्यार्थी चांगल्या उच्च पदस्थ ठिकाणी कार्यरत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना आदर्श नागरिक, चांगला माणूस बनवण्यासाठी शाळा अधिकाधिक प्रयत्नशील असते, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
अशी शाळा जिथं गरिब विद्यार्थ्यांना दिलं जातं मोफत शिक्षण, काय आहे ही नेमकी संकल्पना?, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल