या भागात पुरवठा बंद राहणार
ठाण्यातील घोडबंदर रोड, पातलीपाडा, कोठारी कम्पाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, पवारनगर, आनंदनगर, कासारवडवली, ओवळा आदी ठिकाणचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. बुधवारी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी येणार नसल्याने नागरिकांना पाणी जपून वापरावं लागेल.
Mumbai Rain: मुंबई-ठाण्यात हवापालट, कोकणात मुसळधार पावसाचा अलर्ट, आजचा हवामान अंदाज
advertisement
कळवा आणि मुंब्र्याचा काही भाग, समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, ईटर्निटी, जॉन्सन, जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर या परिसरात देखील पाणीपुरवठा बंद राहील. या भागात बुधवारी रात्री 9 ते गुरुवार सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. अत्यावश्यक दुरुस्तीसाठी टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा वेळेचे नियोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देखील पाण्याचा वापर जपून करावा लागेल.
