उपमुख्यमंत्री अजित पवार लक्ष देतील का?
कर्नाटक आणि कोकण यांचा दळणवळणाच्या दृष्टीने विचार करता कोल्हापूर शहराचं विशेष महत्त्व आहे. शहरातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. त्यामुळे शहरांच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी जागोजागी होताना दिसते. इतकंच नव्हेतर वाहतूक कोंडीचे नवी ठिकाणं तयार झालेली आहेत. आता सर्किट बेंचची स्थापना झाल्यामुळे 6 जिल्ह्यातून पक्षकार, नागरिक आणि वकिलांच्या वाहनांची संख्या वाढली आहे. त्याचेबरोबर अंबाबाई आणि ज्योतिबा ही देवस्थानं प्रसिद्ध असल्यामुळे पर्यटकांच्या वाहनांचीही गर्दी होते.
advertisement
या पार्श्वभूमीवर राज्य आणि जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर मार्ग काढावा आणि वाहतूक कोंडीतून कोल्हापूर शहरवासियांची मुक्तता करावी, असे मत कोल्हापूरकर मांडताना दिसत आहेत. एखादी गोष्टी करायची म्हटली की, ती करणारच... असं अजित पवारांच्या कामाचं वैशिष्ट्य आहे. तर कोल्हापूरातील वाहतूक कोडींच्या प्रश्नाकडे अजित पवार लक्ष देतील का? ठोस उपाय योजना करतील का? असेही प्रश्न शहरवासियांकडून विचारले जात आहेत.
कोल्हापूरातील या विकासाकामांना कधी गती मिळणार?
श्री अंबाबाई मंदिर परिसर तीर्थक्षेत्र आराखडा, आयटी पार्क आणि विविध राज्य-केंद्र शासनाच्या कामांना कधी गती मिळणार, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, श्री अंबाबाई मंदिर परिसर तीर्थक्षेत्र आराखडा मंजूर झाला आहे, त्याच्या पहिल्या टप्प्यातील निधी दिला आहे. उर्वरित भूसंपादन आणि विकासकामांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही. आयटी पार्कचा प्रश्न अजूनही तसाच आहे. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्ग, कोल्हापूर विमानतळ विकास, कागल-सातारा महामार्ग अशा रखडलेल्या कामांनाही गती मिळावी, असेही मत कोल्हापूरकर मांडत आहेत.
हे ही वाचा : BMC Election: मुंबई भाजप अध्यक्षपदी साटमांची निवड, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, ठाकरेंना इशारा
हे ही वाचा : Kolhapur Politics: राजकीय मैदान मारण्यासाठी 'महायुती' सज्ज, 'सर्वांनी साथ द्या', कोल्हापूरात महाडिकांचे आवाहन!