TRENDING:

भाजीपाला शेतीत होईल नफाच नफा, स्मार्ट प्लॅनिंग कसं करावं? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

भाजीपाला शेती ही जलद उत्पन्न देणारी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. मात्र नियोजनाशिवाय केलेली शेती अनेकदा तोट्यात जाते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भाजीपाला शेती ही जलद उत्पन्न देणारी आणि आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. मात्र नियोजन शिवाय केलेली शेती अनेकदा तोट्यात जाते. यामुळे अलीकडच्या काळात ‘स्मार्ट प्लॅनिंग’ हा शब्द शेतीत विशेष महत्वाचा ठरत आहे. माती, हवामान, पाणी उपलब्धता, बाजारातील मागणी आणि पीक कालावधी यांचा अभ्यास करून केलेले शेती नियोजन अधिक फायदेशीर असल्याचे कृषी अभ्यासक लहू चव्हाण यांचे मत आहे. कृषी विभागाकडूनही भाजीपाला शेतीत वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement

स्मार्ट प्लॅनिंगची सुरुवात माती परीक्षणापासून होते. कोणत्या जमिनीत कोणत्या भाज्यांचे उत्पादन योग्य येईल, याचा अंदाज मिळाल्यास खर्च कमी आणि उत्पन्न जास्त मिळू शकते. रेतीमिश्रित जमिनीसाठी टोमॅटो, वांगी आणि कारले ही पिके फायदेशीर ठरतात, तर मध्यम चिकणमाती जमिनीत मिरची, कोबी, फूलकोबी यांचे चांगले उत्पादन येते. मातीतील पोषणतत्त्वांचे योग्य प्रमाण जाणून घेऊन त्या आधारावर खतांचे नियोजन केल्यास गुणवत्तापूर्ण भाजीपाला उत्पादन जवळपास 25 टक्क्यांनी वाढवता येते, असे कृषी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

advertisement

पीक कालावधी लक्षात घेऊन केलेली ‘टप्प्याटप्प्याची शेती’ ही भाजीपाला शेतीत यशस्वी पद्धत मानली जाते. 30 दिवसांत उत्पादन देणारे पालक, मेथी, कोथिंबीर यांसारखे पिके; 60 ते 80 दिवसांमध्ये तयार होणारे भेंडी, वांगी, मिरची यांसारखे पीक आणि 90 दिवसांपेक्षा जास्त वेळ घेणारे फूलकोबी आणि टोमॅटो अशी विभागणी केल्यास वर्षभर सतत उत्पन्न मिळू शकते. शेतकरी मिश्र पीक पद्धती (Intercropping) अवलंबल्यास जोखीम कमी होते आणि प्रति एकर नफा वाढतो. टोमॅटोच्या पिकात मधोमध कोथिंबीर घेतल्यास दुहेरी उत्पन्नाचा फायदा मिळू शकतो, असा अनुभव पुणे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी दिला आहे.

advertisement

तंत्रज्ञानाचा वापर ही सुद्धा स्मार्ट प्लॅनिंगमधील गरज बनत आहे. ड्रिप सिंचन, मल्चिंग आणि तणनियंत्रण तंत्राचा अवलंब केल्यास पाण्याची बचत, मेहनत कमी आणि उत्पादनात सातत्य मिळते. तसेच हवामानातील बदल लक्षात घेऊन पिकांची निवड करणे अत्यंत आवश्यक आहे. मोबाइलवरून हवामान अंदाज, बाजारभाव आणि सरकारी योजना तपासून पेरणीचे वेळापत्रक ठरवणारे शेतकरी आता अधिक यशस्वी ठरत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी नमूद केले आहे. भाजीपाला शेतीचा विचार केवळ पीक म्हणून नव्हे, तर व्यवस्थित नियोजन केलेला ‘व्यवसाय’ म्हणून केला तरच यश मिळेल, असा सल्ला देण्यात येत आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक शेतीला दिला फाटा, केली खरबूज लागवड, शेतकऱ्याची लाखांत कमाई, Video
सर्व पहा

स्थानिक बाजारपेठ, हॉटेल्स, केटरिंग सेवा आणि ऑनलाइन विक्री यांसारख्या पर्यायांचा अभ्यास केल्यास विक्रीसाठी नवी दारे उघडू शकतात. शेतातील मेहनत योग्य पद्धतीने बाजारात पोहोचवण्याची वेळ आल्याचा सूर आता शेतकरी गटातून उमटताना दिसत आहे. योग्य नियोजन, बाजारपेठेचा अभ्यास आणि तंत्रज्ञानाचा वापर — हीच भविष्यातील भाजीपाला शेतीची खरी गुरुकिल्ली ठरत आहे.

Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजीपाला शेतीत होईल नफाच नफा, स्मार्ट प्लॅनिंग कसं करावं? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल